AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalit Prabhakar : ललित प्रभाकर 39 व्या वर्षीही अविवाहित, लग्न का करत नाही? ते सीक्रेट…

अभिनेता ललित प्रभाकर 'प्रहार' मधील कसाब भूमिकेमुळे चर्चेत आहे. 39 व्या वर्षीही तो अविवाहित का आहे, याची चर्चा सुरू आहे. त्याला कोणतीही बंधने नको असल्याने, स्वातंत्र्याला महत्त्व देत आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने लग्नाचा विचार टाळला आहे.

Lalit Prabhakar : ललित प्रभाकर 39 व्या वर्षीही अविवाहित, लग्न का करत नाही? ते सीक्रेट...
Lalit PrabhakarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 11:08 PM
Share

अभिनेता ललित प्रभाकर सध्या देशभर चर्चेचा विषय झाला आहे. ललितने ‘प्रहार’ या सिनेमात कसाबची भूमिका साकारली आहे. या सिनेमात ललित कसाब सारखाच दिसतोय. या सिनेमातील त्याचा अभिनय अत्यंत ताकदीचा झाला आहे. राजकुमार राव सारख्या कसदार अभिनेत्यासमोर ललितने अत्यंत ताकदीची भूमिका साकारल्याने त्याचं कौतुक होत आहे. त्यामुळेच ललितची चर्चा सुरू आहे. व्यावसायिक नाटकातून प्रवास करणाऱ्या ललितने आता हिंदीच्या मोठ्या पडद्यावरही कमाल करून दाखवली आहे.

ललित प्रभाकरच्या अभिनयाची जशी चर्चा सुरू झाली आहे. तशी ललित सिंगल आहे की विवाहित आहे? याचीही चर्चा सुरू आहे. तसेच त्याने वयाच्या 39 मध्येही लग्न का केलं नाही? असंही विचारलं जात आहे. त्यावर अनेक तर्कवितर्कही वर्तवले जात आहेत. पण ललितने या प्रश्नाचं उत्तर अनेकदा दिलं आहे. गेल्यावर्षी तर त्याने एका मुलाखतीत केवळ लग्न या विषयावर त्याची मते मांडली आहेत. तसेच त्याने लग्न का केलं नाही हे सुद्धा स्पष्ट केलं आहे.

म्हणून लग्न केलं नाही

ललितला कोणत्याही बंधनात राहायला आवडत नाही. त्यामुळे तो लग्न करत नाहीये. मेरी दुल्हन तो मेरी आजादी है… असं तो म्हणतो. लग्नानंतर खूप जबाबदाऱ्या येतात. सध्या मी तरी या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तयार नाहीये. त्यामुळेच मी लग्न करायचा विचार करत नाहीये, असं ललितने म्हटलं आहे.

माझा फोकस सध्या वेगळ्या गोष्टीकडे आहे. माझी कामं सुरू आहेत. त्यात मी बिझी आहे. ही कामे मी सध्या एन्जॉय करतोय, असं सांगतानाच जबाबदारी घ्यायला तयार नसताना लग्न केल्यास तो अन्याय ठरेल, असंही तो म्हणतो. मला माझ्यावर किंवा दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करायचा नाहीये. कुणावर बंधन टाकायची नाही आणि स्वत:वरही घ्यायची नाहीयेत, असंही त्याने स्पष्ट केलंय.

ढसाळ येतोय…

ललितच्या कसाबच्या भूमिकेची मोठी चर्चा होत आहे. सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी ललितची भूमिका मात्र गाजत आहे. समीक्षकांनीही ललितच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. आता ललित प्रभाकर आणखी एका तगड्या भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध महाकवी, दलित पँथरचे संस्थापक, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावरील ‘ढसाळ’ या सिनेमात ललित दिसणार आहे. नामदेव ढसाळ आक्रमक, विद्रोही आणि रांगड्या स्वभावाचे होते. त्यांची ही व्यक्तीरेखा ललित कशी साकारतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!