AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: पुन्हा हादरवणारी माहिती समोर… टायगर श्रॉफवर गोळीप्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपींनी सलमान खान याच्या घराची केली रेकी?

Tiger Shroff Firing Case Update: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात तपास पुढे सरकताना धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपींनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची माहितीही आता समोर आली आहे.

Salman Khan: पुन्हा हादरवणारी माहिती समोर... टायगर श्रॉफवर गोळीप्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपींनी सलमान खान याच्या घराची केली रेकी?
आरोपींनी सलमान खानच्या घराची केली रेकी?
| Updated on: Oct 21, 2026 | 6:46 AM
Share

Salman Khan House Recce: टायगर श्रॉफ याच्यावर जुहू येथे रविवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. आरोपींनी 7 राऊंड फायर केले होते. त्यात तो थोडक्यात बचावला. तर याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आरोपींनी सलमान खान याच्या घराची रेकी केल्याची माहिती आता समोर येत आहे. पोलिसांनी या घटनेनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर तिन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने तीनही आरोपींचा ताबा घेतला आहे.

सलमान खान टार्गेटवर?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आरोपींच्या टार्गेटवर भाईजान, सलमान खान होता का? यादृष्टीने तपासाची सूत्र फिरली आहे. आरोपींनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. तपास पुढे सरकत असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी रात्री साडे सातच्या सुमारास आरोपींनी अगदी जवळून टायगरच्या कारवर गोळीबार केला होता. सात राऊंड त्यांनी फायर केले. पण एकाचे पिस्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी लागलीच सूत्र फिरवली आणि आरोपींना राजस्थानमधील कोटा येथे अटक करण्यात आली.

तीनही आरोपी क्राइम ब्रँचच्या ताब्यात

टायगर श्रॉफ याच्यांवरती हल्ला करणाऱ्या तीनही आरोपींना मुंबईत आणण्यात आलेले आहे. मुंबईत आल्यानंतर प्रथम त्यांना जीटी हॉस्पिटल या ठिकाणी मेडिकल साठी घेऊन आणण्यात आले आहेत या ठिकाणाहून मुंबई क्राईम ब्रांच ची टीमने त्यांचा ताबा घेतला आणि पुढील तपास करण्यात येईल.

हल्लेखोरांची मुंबईतील जीटी हॉस्पिटल येथे मेडिकल चाचणी

टायगर श्रॉफ याच्यावरती हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना मुंबई पोलीस यांनी राजस्थान कोटा या ठिकाणाहून रात्री साडेतीन वाजता मुंबईत घेऊन आले. मुंबईत आणल्याच्या नंतर या तीनही आरोपींचा जीटी हॉस्पिटल या ठिकाणी मेडिकल करण्यात आले आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलीस सुरक्षा

पोलिसांनी या घटनेनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. बुलेटप्रुफ जॅकेटसह पोलीस कर्मचारी याभागात दिसत आहेत. तर या परिसरात वाहनं आणि माणसांना थांबण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!