विराट कोहलीच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची हैद्राबादमध्ये कारवाई, आरोपी आहे IIT पासआऊट

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मोहम्मद शमीवर अनेक चूकीच्या टीका करण्यात आल्या. यावेळी कर्णधार विराट त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. ज्यानंतर विराटच्या अवघ्या 10 महिन्याच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याच्या धमक्या विराटला मिळाल्याचा धक्कादायक आणि अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला होता.

विराट कोहलीच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची हैद्राबादमध्ये कारवाई, आरोपी आहे IIT पासआऊट
विराटचं कुटुंब
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 5:59 PM

मुंबई: यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. यात सर्वात पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ज्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमी कमालीचे निराश झाले होते. त्याच पराभवानंतर गोलंदाज मोहम्मद शमीवरही (Mohmmed Shami) चूकीच्या टीका झाल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर त्याच्या समर्थनार्थ उभा राहणाऱ्या विराटच्या बाबतीत त्याहूनही वाईट घडलं. शमीला समर्थन दिलं म्हणून विराटच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला होता. पण याच्या विरोधात पोलिस खात्याने कंबर कसली आणि अखेर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या धमकी देणाऱ्या माथेफिरुला ताब्यात घेतलं आहे. रामनागेश अलीबाथिनी असं ताब्यात घेण्यात आलेल्याचं नाव असून त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.

23 वर्षीय रामनागेश हा हैद्राबादचा असून तो पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. तो काही काळापूर्वी एका फूड डिलेव्हरी अॅपसाठी कामही करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने आयआयटी हैद्राबादमधून बीटेक केल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान ज्या ट्विटर अकाऊंटवरुन धमकी देण्यात आली होती. त्या @Criccrazyygirl या अकाऊंटला पोलिसांनी बंद करत ही कारवाई केली आहे.

दिल्ली महिला आयोगानेही पाठवली होती नोटीस

या सर्व प्रकरणावर कडक कारवाई करण्यासाठी दिल्ली महिला आयोगाने (DCW) काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांना नोटिस पाठवली असून दिल्ली महिला आयोगाने थेट पोलिस उपायुक्त (सायबर सेल)  यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनीही वेगात कारवाई सुरु केली होती.

का झाली होती शमीवर टीका?

टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. ज्यामुळे चाहत्यांचा राग सोशल मीडियाद्वारे खेळाडूंवर  उफाळून आला.  दरम्यान पाकिस्तानच्या हातून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला टीकांचा धनी व्हावं लागलं होतं. कारण शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले होते. ज्यानंतर सेहवागपासून विराटपर्यंत तसेच अनेक परदेशी क्रिकेटपटूही शमीच्या समर्थनार्थ उभे राहिले होते.

इतर बातम्या

टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित

India vs New Zealand: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 3 खेळाडू करणार टीम इंडियामधून डेब्यू, आयपीएलमधील कामगिरीनंतर BCCI कडून संधी

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(Mumbai Cyber police arrested ramnagesh alobathini from hyderabad for giving rape threates to virat kohlis daughter)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.