AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणेच्या निरोपाची तयारी, टीम इंडियात शुभमन गिलकडे नवी जबाबदारी?

आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्री गेल्याने टी-20, वनडे आणि कसोटी खेळाडूंच्या भूमिका बदलतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. रोहित शर्मा टी-20 संघाचा कर्णधार झाला आहे. तो लवकरच एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी स्वीकारणार असल्याचीही चर्चा आहे.

चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणेच्या निरोपाची तयारी, टीम इंडियात शुभमन गिलकडे नवी जबाबदारी?
Cheteshwar Pujara
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 3:19 PM
Share

मुंबई : आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्री गेल्याने टी-20, वनडे आणि कसोटी खेळाडूंच्या भूमिका बदलतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. रोहित शर्मा टी-20 संघाचा कर्णधार झाला आहे. तो लवकरच एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी स्वीकारणार असल्याचीही चर्चा आहे. याशिवाय कसोटी संघाच्या रचनेतही बदल होऊ शकतो. या अंतर्गत मधल्या फळीसाठी नवे चेहरे आजमावण्याचे प्रयोग होऊ शकतात. (India vs New Zealand : BCCI would asked Shubman Gill to play in middle order as Cheteshwar Pujara Ajinkya Rahane can drop)

न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. या मालिकेतील संघाची कामगिरी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची भूमिका तयार करेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारताने आपला ज्युनियर संघ दौऱ्यावर पाठवला आहे. यात दुसऱ्या फळीतील जवळपास सर्वच खेळाडूंचा समावेश आहे.

निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या भवितव्यावर निर्णय घेण्यासाठी वेळ घेण्याचे ठरवले आहे. हे दोन्ही खेळाडू अलीकडच्या काळात आऊट ऑफ फॉर्म असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या बॅटमधून सातत्याने मोठ्या खेळी आलेल्या नाहीत. त्याउलट दोघेही सातत्याने अपयशी ठरले आहेत. आगामी मालिकेत टीम इंडियाच्या मधल्या फळीत बदल होऊ शकतो, असे मानले जात आहे. शुभमन गिलला सलामीऐवजी मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सांगितले जाऊ शकते. त्याचबरोबर रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. सलामीवीर बनल्यानंतर त्याच्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावरही त्याने शतक झळकावले होते.

या खेळाडूंवरही लक्ष

याशिवाय मयंक अग्रवालचा पर्यायही मधल्या फळीसाठी आहे. संघासोबत हनुमा विहारीही आहे आणि तोही तळाला फलंदाजी करतो. तथापि, मयंक आणि हनुमा या दोघांनाही अलीकडच्या काळात कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघात बीसीसीआयने प्रियांक पांचाळ, सरफराज खान, बाबा अपराजित या मधल्या फळीतील फलंदाजांना ठेवले आहे. आगामी काळात या खेळाडूंना टीम इंडियाच्या निवडीत प्राधान्य मिळू शकते.

न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेनंतर भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी, मायदेशात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी आणि इंग्लंडमध्ये एक कसोटी खेळायची आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच बांगलादेशविरुद्ध एक कसोटी मालिका खेळावी लागेल. या सर्व मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहेत.

इतर बातम्या

टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित

India vs New Zealand: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 3 खेळाडू करणार टीम इंडियामधून डेब्यू, आयपीएलमधील कामगिरीनंतर BCCI कडून संधी

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(India vs New Zealand : BCCI would asked Shubman Gill to play in middle order as Cheteshwar Pujara Ajinkya Rahane can drop)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.