मोठी बातमी: टी20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे, न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

इकडे 14 नोव्हेंबरला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता घोषित होईल आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे.

मोठी बातमी: टी20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे, न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
भारतीय क्रिकेटर्स
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 11:09 PM

मुंबई: भारताचा यंदाच्या विश्वचषकातील (T20 World Cup) प्रवास सेमीफायनलच्या सामन्यांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ भविष्यातील सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. इकडे विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही नुकतेच जाहीर झाले असून आता सर्वात पहिल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघही जाहीर केला आहे. यावेळी टी20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सिलेक्शन कमिटीने भारतीय टीमची घोषणा केली आहे. यावेळी 3 खेळाडूंना प्रथमच भारतीय संघात स्थान मिळणार आहे. ज्यामध्ये आवेश खान आणि हर्षल पटेल हे टी20 टीममध्ये असून ऑलराउंडर वेंकटेश अय्यरलाही संधी मिळाली आहे. या तिघांनी आयपीएल 2021 मध्ये अप्रतिम प्रदर्शन केलं होतं.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

8 खेळाडूंना विश्रांती

टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये खेळणाऱ्या 8 खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती यांची नावं आहेत.

न्यूझीलंड संघाचा भारत दौरा

17 नोव्हेंबर रोजी या दौऱ्याची सुरुवात होईल. यावेळी पहिला T20 सामना जयपुरमध्ये, दुसरा T20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. T20 मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 25 नोव्हेंबर ते  29 नोव्हेंबर दरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात मुंबच्ईया वानखेड़े मैदानात खेळवली जाईल.

इतर बातम्या

T20 World Cup: ‘हा’ आहे भारत, ‘हे’ आहे भारताचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, नामिबीयाविरुद्धच्या सामन्या पंतचा ‘तो’ VIDEO व्हायरल

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

(Rohit sharma is team indias t20 team captain for upcoming new zealand tour)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.