T20 World Cup Semi Final: सेमीफायनलपूर्वी पाकिस्तान 2 खेळाडूंना अंतिम 11 मधून बाहेर करणार, कर्णधार बाबरचं मोठं स्पष्टीकरण

यंदाच्या विश्वचषकातील 5 पैकी 5 सामने जिंकत पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये प्रेवश मिळवला आहे. आता पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

T20 World Cup Semi Final: सेमीफायनलपूर्वी पाकिस्तान 2 खेळाडूंना अंतिम 11 मधून बाहेर करणार, कर्णधार बाबरचं मोठं स्पष्टीकरण
Pakistan-Cricket-Team

T20 World Cup 2021: यंदाच्या टी 20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघ अप्रतिम कामगिरी करत आहे. एका मागो माग एक अशा सलग 5 सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. पण आता सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर असताना संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आतापर्यंत खास कामगिरी न करु शकलेल्या फखर जमान आणि हसन अली यांना संघाबाहेर ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो.

पण या दोघांच्या समर्थनार्थ बोलताना संघाचा कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) त्यांची बाजू घेतली. मंगळवारी बाबरने दिलेल्या माहितीनुसार फखर आणि हसन हे दिग्गज खेळाडू असून ते मोठ्या सामन्यांमध्ये उत्तम प्रदर्शन करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे ते सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये नक्कीच कामगिरी करतील, मीडियाशी ऑनलाइन पद्धतीने संवाज साधताना बाबरने ही प्रतिक्रिया दिली.

‘दोघांना संघाबाहेर करण्याचा विचारच करु शकत नाही’

यावेळी बाबरने फखरने ज्याप्रमाणे 2017 चॅपियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक ठोकून भारताला मात दिली होती. त्याची आठवन करुन दिली.  तर हसन अलीबद्दल सांगताना तो एक मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे. सध्या तो फॉर्ममध्ये नसून प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत अशी वेळ येते असंही बाबर म्हणाला.

असे असतील सेमीफायनलचे सामने

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पहिला सेमीफायनलचा सामना बुधवारी (10 नोव्हेंबर) पार पडणार आहे. यावेळी न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आमने सामने असणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. यावेळी 7 वाजता नाणेफेक होईल. दुसरा सामना शुक्रवारी (11 नोव्हेंबर) वरील वेळेप्रमाणेच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या चारही संघातून विजयी दोन संघ रविवारी 14 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळतील.

इतर बातम्या

T20 World Cup: ‘हा’ आहे भारत, ‘हे’ आहे भारताचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, नामिबीयाविरुद्धच्या सामन्या पंतचा ‘तो’ VIDEO व्हायरल

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

(T20 World cup 2021 semi final match in Pakistan vs australia hasan ali and fakhar zaman will definetely in team says babar azam)

Published On - 5:14 pm, Tue, 9 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI