IND vs ENG | शेवटच्या 3 टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर, पहिल्यांदाच ‘या’ खेळाडूला संधी

| Updated on: Feb 10, 2024 | 11:48 AM

IND vs ENG | भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेली पाच टेस्ट मॅचची सीरीज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने हैदराबादमधील पहिला कसोटी सामना जिंकला. तेच भारताने विशाखापट्टनम टेस्ट जिंकून मालिकेत पुनरागमन केलं. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरु होणार आहे.

IND vs ENG | शेवटच्या 3 टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर, पहिल्यांदाच या खेळाडूला संधी
Team india
Image Credit source: PTI
Follow us on

IND vs ENG Test Series | बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केलीय. सर्वच अंदाज चुकीचे ठरलेत. विराट कोहली व्यक्तीगत कारणांमुळे तिन्ही कसोटी सामन्यात खेळणार नसल्याच बीसीसीआयकडून सांगण्यात आलय. श्रेयस अय्यरही टीमच्या बाहेर गेलाय. दिलासा देणारी बाब म्हणजे रवींद्र जाडेजा आणि केएल राहुलचा टीममध्ये समावेश झालाय. दोघांनी फिटनेस टेस्ट पास केल्यानंतरच त्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होईल हे बीसीसीआयने स्पष्ट केलय. तेच पहिल्यांदाज बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला टेस्ट टीममध्ये स्थान मिळालय.

सीनियर सिलेक्शन कमिटीची शुक्रवारी 9 फेब्रुवारीला एक बैठक झाली. त्यात स्क्वॉडवर चर्चा झाली. रविवारी 10 फेब्रुवारीला बोर्डाने टीमची घोषणा केली. स्कवॉडमध्ये कुठलाही मोठा बदल करण्यात आलेला नाही. फक्त आकाश दीप एक नवीन चेहरा आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर बाहेर गेल्याने सरफराज खान आणि रजत पाटीदार टीममध्ये आपल स्थान टिकवण्यात यशस्वी ठरलेत.

तिसऱ्या कसोटीसाठी टीममध्ये कोणा-कोणाच पुनरागमन?

15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सीरीजमधला तिसरा कसोटी सामना सुरु होईल. टीम इंडियात केएल राहुल आणि रवींद्र जाडेजाच पुनरागमन निश्चित आहे. दोन्ही स्टार खेळाडू दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकले नव्हते. आता तिसऱ्या कसोटीत त्यांचं खेळण हे मेडिकल टीमच्या क्लियरन्सवर अवलंबून आहे. दोघांशिवाय मोहम्मद सिराजही टीममध्ये परतलाय. ज्याला दुसऱ्या कसोटीसाठी आराम देण्यात आला होता.


पुढच्या 3 टेस्ट मॅचसाठी भारताचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल (फिटनेस), रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरैल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेस), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार और आकाश दीप.