आयपीएल 2026 स्पर्धा संपताच टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज, असं आहे पुढच्या सामन्यांचं वेळापत्रक

आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार दोन महिने चालला आणि 31 मे रोजी आरसीबीच्या विजयासह सांगता झाली. या स्पर्धेनंतर टीम इंडिया आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया 6 जूनपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळताना दिसणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा संपताच टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज, असं आहे पुढच्या सामन्यांचं वेळापत्रक
आयपीएल 2026 स्पर्धा संपताच टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज, असं आहे पुढच्या सामन्यांचं वेळापत्रक
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 01, 2026 | 5:45 PM

आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व मोठ्या दिमाखात पार पडलं. यंदाच्या पर्वात आरसीबीने जेतेपद कायम राखलं. सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. आता फ्रेंचायझी क्रिकेटमधून बाहेर येत टीम इंडिया आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर एका आठवड्याच्या आत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वनडे, टी20 आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. टीम इंडिया 6 जूनपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळण्यास सुरूवात करणार आहे. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी पुन्हा मैदानात उतरणार असल्याने शुबमन गिल आणि इतर अनेक स्टार खेळाडू मैदानावर परततील. भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. तर टी20 संघाचं कर्णधारपदी सूर्यकुमार यादव असून पुढे काय होईल हे काही सांगता येत नाही.

भारतीय संघाचं डिसेंबर 2026 पर्यंतचं क्रिकेट वेळापत्रक ठरलेलं आहे. यासाठी 6 जूनपासून सुरूवात होणार असून पहिला सामना न्यू चंदीगडच्या मैदानात होणार आहे. या मैदानात भारत आणि अफगाणिस्तान एक कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. यासाठी संघ आधीच जाहीर केलेला आहे. तर एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेसाठी युवा संघ जाणार आहे. चला जाणून घेऊयात डिसेंबरपर्यंतचं वेळापत्रक

टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक

जून 2026

  • 6-10 जून: भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना
  • 13-20 जून: भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका (3 सामने)
  • 26-29 जून: भारताचा आयर्लंड दौरा (2 टी20 सामने)

जुलै 2026

  • 1-11 जुलै: भारताचा इंग्लंड दौरा (5 टी20 सामने)
  • 14-19 जुलै: भारताचा इंग्लंड दौरा (3 एकदिवसीय सामने)
  • 23-26 जुलै: भारताचा झिम्बाब्वे दौरा (3 टी20 सामने)

ऑगस्ट 2026

  • भारताचा श्रीलंका दौरा (2 कसोटी, 3 टी20) – तारखा अद्याप निश्चित व्हायच्या आहेत

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026

  • 17 सप्टेंबर – 3 ऑक्टोबर: आशियाई खेळ 2026, जपान (टी20 स्वरूप)
  • 27 सप्टेंबर – 3 ऑक्टोबर: भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका (3 सामने)
  • 6-17  ऑक्टोबर: भारत-वेस्ट इंडिज टी२० आंतरराष्ट्रीय मालिका (5 सामने)

ऑक्टोबर आणि डिसेंबर 2026

22 ऑक्टोबर – डिसेंबर: भारताचा न्यूझीलंड दौरा (2 कसोटी, 5 एकदिवसीय, 5 टी20)

Follow Us