मिचेल सँटनरने घेतलेल्या कॅचची क्रीडाविश्वात चर्चा, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल आवाक्

क्रीडाविश्वात मिचेल सँटनरने घेतलेल्या झेलची चर्चा रंगली आहे. द हंड्रेड स्पर्धेत लंडन स्पिरिट आणि नॉर्थन सुपरचार्जर्स यांच्यात सामना पार पडला. या मिचेल सँटनरने जबरदस्त झेल घेतला. त्याचा हा अप्रतिम झेल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिचेल सँटनरने घेतलेल्या कॅचची क्रीडाविश्वात चर्चा, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल आवाक्
| Updated on: Aug 14, 2024 | 4:49 PM

द हंड्रेड स्पर्धेत एका अप्रतिम झेलचं दर्शन घडलं. न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू मिचेल सँटनरने एक अप्रतिम झेल घेत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याचा हा झेल पाहिल्यानंतर तुम्हीही आवाक् होऊन जाल, यात शंका नाही. लंडन स्पिरिट आणि नॉर्थन सुपरचार्जर्स यांच्यात द हंड्रेड स्पर्धेत 29वा सामना खेळला गेला. या सामन्यात नॉर्थन सुपरचार्जर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंडन स्पिरीटने प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूत 8 विकेट गमवून 111 धावा केल्या. दरम्यान या सामन्यात नॉर्थन सुपरचार्जर्सने 44 चेंडूत 1 गडी गमवून 64 धावा केल्या. मात्र पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार नॉर्थन सुपरचार्जर्सला विजयी घोषित केलं गेलं. 21 धावांनी नॉर्थन सुपरचार्जर्सचा विजय झाला. नॉर्थन सुपरचार्जर्सला या विजयामुळे फायदा झाला असून स्पर्धेतील आव्हान कायम आहे. 11 गुणांसह नॉर्थन सुपरचार्जर्स दुसऱ्या स्थानावर आहे. बाद फेरीत स्थान पक्कं करण्यासाठी वेल्श फायर आणि मॅन्चेस्टर ओरिजनल्स यांच्या सामन्यावर अवलंबून राहावं लागेल. असं सर्व गणित असताना या सामन्यात चर्चा रंगली ती मिचेल सँटनरच्या झेलची.

लंडन स्पिरिटकडून फलंदाजीसाठी मायकल पेपर आणि जेनिंग्स ओपनिंगला आले होते. 11 व्या चेंडूवर पेपर मिड ऑनवरून शॉट मारला. या चेंडूवर नजर ठेवत शेवटपर्यंत मिचेल सँटनरने नजर ठेवली. तसेच वेगाने धावत डीप मिड ऑनजवळ हवेत उडी घेत झेल पकडला. पेपरने या दरम्यान तीन धावा घेतल्या होता. द हंड्रेडने एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

लंडन स्पिरिट (प्लेइंग इलेव्हन): मायकेल-काईल पेपर (विकेटकीपर), कीटन जेनिंग्स, डॅनियल लॉरेन्स (कर्णधार), मॅथ्यू क्रिचले, शिमरॉन हेटमायर, आंद्रे रसेल, रवी बोपारा, लियाम डॉसन, ऑली स्टोन, रिचर्ड ग्लेसन, डॅनियल वॉरल.

नॉर्थर्न सुपरचार्जर्स (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, ग्रॅहम क्लार्क, ऑलिव्हर रॉबिन्सन, हॅरी ब्रूक (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), ॲडम होस, मिचेल सॅन्टनर, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, पॅट्रिक ब्राउन, रीस टोपले