Tilak Varma: हातातून गेलेला सामना भारताने जिंकला; तिलक वर्माने उघडलं विजयाचं रहस्य, गंभीर यांचाही खास उल्लेख!

Tilak Varma Statement: दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला चार गडी राखून पराभूत केले. भारतीय संघाने १९.५ षटकांत सहा गडी गमावून न्यूझीलंडचे १८१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

Tilak Varma: हातातून गेलेला सामना भारताने जिंकला; तिलक वर्माने उघडलं विजयाचं रहस्य, गंभीर यांचाही खास उल्लेख!
| Updated on: Oct 24, 2026 | 6:42 PM

टीम इंडियाने क्राइस्टचर्च येथे यजमान न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात तिलक वर्माने सहा चौकार आणि एका षटकारासह २६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. १८० धावांचा पाठलाग करताना भारताला शेवटच्या तीन षटकांत विजयासाठी ४६ धावांची गरज होती. सहा गडी बाद झाले होते.

तिलक वर्मा १३ चेंडूंमध्ये १७ धावांवर तर नितीश रेड्डी ९ चेंडूंमध्ये १६ धावांवर खेळत होते. त्यानंतर तिलकने वादळी खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. एक चेंडू आधीच भारताला विजय मिळवून दिला. विजयानंतर तिलकने धावांचा पाठलाग करण्याची योजना उघड केली आहे. धावांचा पाठलाग करताना पाच गडी गमावल्यानंतर तुमची मानसिकता काय होती, असे तिलकला विचारण्यात आले.

Loading...

त्यावर तिलक म्हणाला की, त्या टप्प्यावर, मी फक्त शेवटपर्यंत खेळण्याचा विचार करत होतो. आजच्या सामन्यापूर्वी मी प्रशिक्षक गौतम सर आणि सितांशु कोटक सर यांच्याशी बोलत होतो. त्या संभाषणादरम्यान ते एक अशी गोष्ट म्हणाले ज्यावर आमचा सर्वांचा विश्वास आहे. संपूर्ण भारताचाही तुमच्यावर विश्वास आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलात, तर तुम्ही आमच्यासाठी सामना जिंकाल. माझ्या मनात फक्त हीच एक गोष्ट घोळत होती, असं त्याने सांगितलं.

तो पुढे म्हणाला की, मला सामना शेवटपर्यंत शक्य तितका पुढे न्यायचा होता. अखेरीस जसा सर्वांचा विश्वास होता तेच घडले. त्यामुळे मला स्वतःचा अभिमान वाटतो. मी नमनला सांगत होतो की आपण शेवटपर्यंत टिकून राहू. आज खेळपट्टी मागच्या सामन्यापेक्षा थोडी संथ होती, म्हणून मी नमनला सांगितले की जेव्हा फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत असतील, तेव्हा आपण धावा काढण्यासाठी वेगाने धावले पाहिजे.

तिलकने सांगितले की, हीच आमची योजना होती. आम्ही तसेच केले, पण दुर्दैवाने मिचेल सँटनरच्या शेवटच्या षटकात नमन बाद झाला. नाहीतर मला वाटते की आम्ही १८ व्या षटकातच सामना संपवला असता. याचे श्रेय नमनलाही जाते, तो खूप चांगला खेळला. त्यानंतर आज हैदराबादच्या मुलांनी (नितीश रेड्डी आणि मी) खूप चांगले काम केले. आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही सामना जिंकला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us