‘पॅचअप करण्यासारखं काहीच नाही’, कोहलीसोबतच्या हस्तांदोलन वादावर ट्रेव्हिस हेड स्पष्टच म्हणाला

आयपीएल 2026 स्पर्धेत विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद झाला होता. शा‍ब्दिक चकमक झाल्यानंतर विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडसोबत हस्तांदोलन करण्याचं टाळलं होतं. त्यामुळे मतभेदाच झाल्याचा अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. आता ट्रेव्हिस हेडने स्पष्टीकरण दिलं आहे.

पॅचअप करण्यासारखं काहीच नाही, कोहलीसोबतच्या हस्तांदोलन वादावर ट्रेव्हिस हेड स्पष्टच म्हणाला
'पॅचअप करण्यासारखं काहीच नाही', कोहलीसोबतच्या हस्तांदोलन वादावर ट्रेव्हिस हेड स्पष्टच म्हणाला
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jul 25, 2026 | 3:31 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर आरसीबीने नाव कोरलं. पण या स्पर्धेतील विराट कोहलीशी निगडीत एक वाद मात्र चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात सदर प्रकार घडला होता. या सामन्यात फलंदाजी करत असताना ट्रेव्हिस हेड बाद झाल्यानंतर विराटने आक्रमक सेलीब्रेशन केलं होतं. त्यानंतर विराट फलंदाजीला आला तेव्हा त्याने गंमतीने हेडला गोलंदाजी करण्याचं आव्हान दिलं होतं. मात्र विराट कोहली 15 धावांवर बाद झाला. हेडने हाच धागा पकडून विराट कोहलीला डिवचलं होतं. गोलंदाजी करण्यापूर्वीच बाद झाला असा टोमणा मारला आणि विराट कोहली संतापला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत होते. तेव्हा हेड समोर आल्यानंतर विराटने त्याच्या हस्तांदोलन करणं टाळलं आणि पुढे निघून गेला. यानंतर विराटच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रेव्हिस हेडची पत्नी जेसिका आणि मुलीला लक्ष्य करत ट्रोल केलं होतं. आता या वादावर ट्रेव्हिस हेडने मौन सोडलं सांगितलं की, विराट कोहलीसोबत माझं वैयक्तिक भांडण किंवा वाद नाही.

त्या वादावर ट्रेव्हिस हेडने अखेर मौन सोडलं

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेड म्हणाला की, ‘मला नाही वाटत की पॅचअप करण्यासारखं काही आहे. असं काही घडलं नाही. स्पर्धा जशी झाली किंवा जे काही घडले, त्यात काही आश्चर्य नाही. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच घडलं.’ ट्रेव्हिस हेडच्या वक्तव्यानंतर हस्तांदोलन प्रकरणाला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे. ट्रेव्हिस हेड पुढे म्हणाला की, ‘मी आणि जेसिका या गोष्टींकडे योग्य दृष्टिकोनातून पाहतो. आम्हाला माहित आहे की आपण ज्या जगात राहतो, त्याचाच हा एक भाग आहे. पण खरी समस्या तेव्हा निर्माण झाली, जेव्हा हे प्रकरण कुटुंबातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचले. त्यांना अशा गोष्टी पाहण्याची सवय नाही.’

ट्रेव्हिस हेडने या प्रकणावर पुढे सांगितलं की, ‘लोक काही दिवसांनी सर्व काही विसरतात. जेसिकाने संपूर्ण परिस्थिती उत्कृष्टपणे हाताळली. खरे आव्हान हे आहे की कुटुंबातील इतर सदस्य ही गोष्ट कशी स्वीकारतात.” हेड यांनी स्पष्टपणे सांगितले की, खेळाडूंवर टीका करणे हा खेळाचा एक भाग असू शकतो, परंतु सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणे योग्य नाही.’ ट्रेव्हिस हेडच्या वक्तव्यावरून आता या प्रकरणाला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us