दुलीप ट्रॉफीत 2 विकेट काढल्यानंतर वैभव सूर्यवंशीने सांगितली मन की बात, गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा
वैभव सूर्यवंशी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे. रेड बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न आहे. पण फलंदाजीत काही खास करू शकला नाही. असं असताना गोलंदाजीत मात्र कमाल केली.

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन या दोन संघात सामना खेळला गेला. या सामन्यात इशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोन संघाने नॉर्थ इस्ट झोनला एक डाव आणि 210 धावांनी पराभूत करून उपांत्य फेरी गाठली आहे. हा सामना ईस्ट झोनने सहज जिंकला, पण वैभव सूर्यवंशी फलंदाजीत आपलं योगदान देऊ शकला नाही. पदार्पणाच्या सामन्यात 6 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत दोन चौकार मारले आणि तंबूत परतला. वैभव सूर्यवंशी बॅटिंगमध्ये अपयशी ठरला असला तरी गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत 4 चेंडूत 2 विकेट काढल्या. हा सामना संपल्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या गोलंदाजीसाठी कशी रणनिती आखली होती याबाबत खुलासा केला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत वैभव सूर्यवंशीने गोलंदाजीचं गुपित सांगितलं आहे.
वैभव सूर्यवंशीने सांगितलं की, सामन्यात विरोधी संघाचे विकेट पडत नव्हते. अशा स्थितीत दोन तीन षटकं टाकण्यास सांगितली. इशानला वाटलं की मला गोलंदाजी देऊन जोखिम घेत आहे. पण त्याला माहिती नाही की मी विकेट टेकर आहे. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू होती की पाच विकेट जरी घेतल्या तरी मला 3 षटकंच मिळणार आहेत. यासाठी मला तीन षटकात अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं गरजेचं होतं.
𝐁𝐨𝐰𝐥 𝐢𝐭 𝐥𝐢𝐤𝐞 𝐕𝐚𝐢𝐛𝐡𝐚𝐯 𝐒𝐨𝐨𝐫𝐲𝐚𝐯𝐚𝐧𝐬𝐡𝐢 🎯
Meet the secret wicket-taker who enjoys bowling and answered his captain’s ‘risky’ call 🤙 – By @jigsactin#DuleepTrophy pic.twitter.com/ZhZ0QkeyZm
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 29, 2026
वैभव सूर्यवंशीने पुढे सांगितलं की, गोलंदाजी करताना आणि विकेट काढताना मजा आली. कारण या सामन्यात माझी फलंदाजी काही खास झाली नव्हती. त्यामुळे गोलंदाजीत योगदान दिल्याने बरं वाटलं. एका फलंदाजाला विकेट मिळते तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच असतो. कोणत्याही फलंदाजाला तुम्ही विचारलं तर तो सांगेल की गोलंदाजी करायची मजा येते, आणि या उलट गोलंदाजाला विचारलं तर तो सांगेल फलंदाजी करायला मजा येते. दोघांना तेवढाच आनंद मिळतो.
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ईस्ट झोनचा सामना सेंट्रल झोनशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत साउथ झोनचा सामना नॉर्थ झोनशी होणार आहे. हे सामना 30 ऑगस्टला बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खेळले जाणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत वैभवची बॅट काही चालली नाही, आता उपांत्य फेरीत वैभव काय करतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. वैभवने या सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीत विकेट काढल्या. तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख निर्माण होऊ शकते.