Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास

Manish Ojha On Vaibhav Sooryavanshi Team India Debut : वैभव नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र झाला आहे. मात्र त्याला संधी केव्हा आणि कुणाविरुद्ध मिळणार? याबाबत त्याचे कोच मनिष ओझा काय म्हणाले? जाणून घ्या.

Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
Vaibhav Sooryavanshi and Coach Manish Ojha
Image Credit source: Michael Steele/Getty Images and PTI
| Updated on: Apr 09, 2026 | 10:39 PM

सर्वात कमी वयात (13 वर्ष) आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची गेल्या वर्षापासून क्रिकेट विश्वात फक्त चर्चाच नाही तर दबदबा आणि तडाखाही पाहायला मिळतोय. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळवणाऱ्या वैभवने 18 व्या आणि पदार्पणातील मोसमात (IPL 2025) तडाखेदार शतक झळकावलं. वैभवने वयाच्या 14 व्या वर्षी शतक झळकावलं. वैभव यासह आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान शतक करणारा पहिला युवा भारतीय फलंदाज ठरला. वैभवने तेव्हापासून सात्याने विविध वयोगटातील स्पर्धेत चमकदार कामगिरी केलीय. वैभवने अनेक गोलंदाजांची धुलाई करुन खोऱ्याने धावा करत असंख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र हा युवा फलंदाज जसप्रीत बुमराह सारख्या टॉपच्या गोलंदाजासमोर कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. त्यामुळे बुमराह-वैभव या बॅटलकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र वैभव इथेही सरस ठरला. वैभव सूर्यवंशी याने ‘दुनिया हिले देंगे हम’ म्हणणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या बुमराहसोबत इतर गोलंदाजांचीही धुलाई केली. राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजाने 7 एप्रिलला...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us