AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Century : सेंच्युरी ठोकण्याआधी विराटने ‘या’ मंदिरात घेतलेलं दर्शन, 2 महिन्यात विराटने काय नाय केलं?

India vs Australia: विराट कोहलीने मागच्या 2 महिन्यात 3 शतकं ठोकली आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा 40 महिन्यांपासूनच दुष्काळ संपला. रविवारी अहमदाबादमध्ये विराट कोहलीची 40 महिन्यांची प्रतिक्षा संपली.

Virat Kohli Century : सेंच्युरी ठोकण्याआधी विराटने 'या' मंदिरात घेतलेलं दर्शन, 2 महिन्यात विराटने काय नाय केलं?
Virat kohli centuryImage Credit source: bcci twitter
| Updated on: Mar 12, 2023 | 3:35 PM
Share

Virat kohli Century : विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात शतक झळकवलय. त्याच्या क्रिकेट करिअरमधील हे 75 व आणि टेस्टमधील 28 व शतक आहे. मागच्या 2 महिन्यात विराटने चांगली कामगिरी केलीय. त्याने 3 सेंच्युरी झळकवल्या आहेत. या सेंच्युरीआधीच वैशिष्ट्य म्हणजे विराट कोहली नीम करोली बाब आणि महाकालच्या दर्शनाला गेला होता. मंदिरात माथा टेकवल्यातंर विराटने आपलं शतकाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी अहमदाबादमध्ये विराट कोहलीची 40 महिन्यांची प्रतिक्षा संपली.

त्याने मागच कसोटी शतक बांग्लादेश विरुद्ध 2019 मध्ये झळकवलं होतं. अहमदाबादच्या शतकाआधी विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकालच दर्शन घेतलं.

पराभवानंतर महाकाल

बॉर्डर-गावस्कर सीरीजचा तिसरा कसोटी सामना इंदोरमध्ये खेळला गेला. भारताला या कसोटी सामन्यात 9 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत विराटची बॅट तळपली नाही. इंदोरमधील पराभवानंतर विराट कोहली उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला होता. तो तिथे भस्म आरतीमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. अहमदाबादमध्ये विराटने टीम अडचणीत असताना शतकी खेळी साकरली आहे. त्यामुळे करिअरमधील या 75 व्या शतकाच मोल मोठं आहे.

नीम करोली बाबांच दर्शन त्यानंतर शतक

कोहली वर्षाच्या सुरुवातीला वृंदावनच्या नीम करोली बाबांच्या आश्रमात गेला होता. त्यानंतर त्याने पुढच्याच सामन्यात गुवाहाटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध 113 धावा फटकावल्या. श्रीलंकेविरुद्ध त्याची बॅट तिरुवनंतपूरममध्येही तळपली. कोहलीने तिथे 166 धावा ठोकल्या. विराट कोहली त्याआधी मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात उत्तराखंडच्या नीम करोली बाबांच्या दर्शनासाठी पोहोचला होता. त्यानंतर त्याने बांग्लादेश विरुद्ध शतक ठोकलं. आता 3 वर्षानंतर त्याच्या बॅटमधून टेस्ट क्रिकेटमध्ये शतक निघालय.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट