AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तसं केलं की टोमणा मारतो! प्रिया सरोज रिंकु सिंहबाबत काय म्हणाली? एक गुपितही केलं उघड

क्रिकेटपटू रिंकु सिंह आणि त्याची होणारी पत्नी प्रिया सरोज सोशल मीडियावर चर्चेत असतात. प्रिया सरोजने नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यात तिने रिंकु सिंहबाबत बरंच काही सांगितलं. एक बाब रिंकुला अजिबात आवडत नाही आणि तिने तसं केलं तर ओरडतो, असा खुलासा प्रिया सरोज हीने केला आहे.

...तसं केलं की टोमणा मारतो! प्रिया सरोज रिंकु सिंहबाबत काय म्हणाली? एक गुपितही केलं उघड
...तसं केलं की टोमणा मारतो! प्रिया सरोज रिंकु सिंहबाबत काय म्हणाली? एक गुपितही केलं उघडImage Credit source: PTI
| Updated on: Jul 30, 2026 | 5:06 PM
Share

रिंकु सिंहची होणारी पत्नी आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांची एक मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने आपल्या नात्याबाबत बरंच काही सांगितलं आहे. प्रिया सरोजच्या बहिणीच्या फूड ब्लॉगिंग पेजला प्रमोट करण्यासाठी दोघांची इंस्टाग्रामवर पहिली भेट झाली होती. त्यांनंतर प्रिया यांनी रिंकूची इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिली आणि त्याच्या एका फोटोला ‘लाईक’ केले. फोटो लाईक केल्याचे पाहिल्यानंतर रिंकूने स्वतःहून पुढाकार घेत प्रिया यांना “हाय, हॅलो, कशा आहात?” असा मेसेज पाठवला. येथूनच त्यांच्या संभाषणाची खरी सुरुवात झाली होती. त्यानंतर प्रेमात पडले आणि लग्नाचा निर्णय घेतला आहे. रिंकु आणि प्रिया यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. रिंकु सिंह कसा वागतो? त्या काय आवडतं? का केलं की रागवतो? याबाबत प्रिया सरोजने खुलास केला आहे. इतकंच काय तर रिंकु सिंहचं एक गुपितही तिने उघड केलं आहे.

रिंकु सिंह प्रिया सरोजला का ओरडतो?

प्रिया सरोजने एका मुलाखतीत सांगितलं की, रिंकु सिंह त्याच्या डाएटची खूप काळजी घेतो. तसेच प्रियाने काही चुकीचं खाल्लं तर तो तिला ओरडतो. प्रिया सरोजने सांगितलं की, ‘मला खूप ओरडा मिळतो. काहीही गोड खात नाही. शीतपेये पीत नाही. मी व्हाईट सॉसमधला पास्ता भरपूर खाते. तो आजूबाजूला असतो तेव्हा सतत माझ्या टोमणे मारत असतो. हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस. व्यायाम करायचा असतो. तो सकाळी उठतो. तो जिममध्ये जातो. तो सराव करतो आणि जेव्हा तो मोकळा असतो, तेव्हा तो मला फोन करून विचारतो की तो कधी फ्री आहे. त्याला सामाजिक जीवन आवडत नाही. तो आपला वेळ एकटाच घालवतो.’

प्रिया सरोजन रिंकुचं गुपित केलं उघड

प्रिया सरोजने सांगितलं की, साखरपुड्याला जबरदस्त नाचले होते. पण रिंकु सिंह लाजत होता. रिंकु पण जबरदस्त नाचतो. पण खूप लाजतो. प्रिया सरोज म्हणाली की, ‘रिंकू सिंग खूप छान नाचतो, पण तो फक्त मित्रांसोबतच नाचतो. तो खूप लाजाळू आहे. तो सामन्यानंतरच्या पार्टीत अप्रतिम नाचतो. मला अजिबात लाज वाटत नाही. मी नाचते.’

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल