AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना

या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. कसोटी मालिका 2-1 अशी जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

IND vs SA 1st ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa series) आगामी मालिकेसाठी भारतीय संघ नेटमध्ये सध्या जोरदार सराव करत आहे.
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 7:00 AM
Share

डरबन: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind vs sa) आजपासून पार्लमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्याजागी प्रथमच केएल राहुल वनडेमध्ये नेतृत्व करणार आहे. सात वर्षात विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदाच एक सामान्य खेळाडू म्हणून संघात खेळणार आहे. या वनडे मालिकेच्या निमित्ताने केएल राहुलची कर्णधार म्हणून क्षमता तपासली जाईल. मोक्याच्याक्षणी राहुल सल्ल्यासाठी विराटवरच अवलंबून असेल. या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे.

कसोटी मालिका 2-1 अशी जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. इंग्लंड विरुद्ध राहुल मधल्या फळीत खेळला होता. पण उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो शिखर धवनसह सलामीला उतरेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला आणखी वाट पहावी लागू शकते. शिखर धवनसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. कारण टी-20 मध्ये धवनने जवळपास आपलं स्थान गमावलचं आहे.

भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे कधी आहे? भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे आज 19 जानेवारी 2022 रोजी आहे. तीन सामन्यांची ही सीरीज आहे.

पहिली वनडे किती वाजता सुरु होणार? बुधवारी भारतीय वेळेनुसार पहिली वनडे दुपारी 2 वाजता सुरु होईल. टॉस दुपारी 1.30 वाजता होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे कुठे आहे? पार्लच्या बोलँड पार्कवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिली वनडे आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या पहिल्या वनडेचं कुठे प्रेक्षपण होणार आहे? भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या तीन मॅचच्या वनडे सीरीजचं स्टार स्पोटर्सवर वर लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे.

पहिल्या वनडेचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल? हॉटस्टारवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या पहिल्या वनडेचं लाइव्ह स्ट्रीमिंग होईल.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली