AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIW vs AUSW : ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, विंडीजचा 43 धावांनी धुव्वा

West Indies Women vs Australia Women 1st T20I Match Result : ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजवर पहिल्या टी 20I सामन्यात 43 धावांनी विजय मिळवला आहे.

WIW vs AUSW : ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, विंडीजचा 43 धावांनी धुव्वा
Beth MooneyImage Credit source: icc
| Updated on: Mar 21, 2026 | 3:53 AM
Share

ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमने वेस्ट इंडिज दौऱ्याची विजयी सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने विंडीजवर पहिल्या टी 20i सामन्यांत दमदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सोफी मोलिनिक्स हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे. सेंट व्हिन्सेंटमधील किंग्जटाउन इथे आर्नोस व्हेल ग्राउंडमध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने या विजयी धावांचा पाठलाग करताना संपूर्ण ओव्हर खेळून काढल्या. मात्र एकाही महिला फलंदाजाला विंडीजला विजयी करता येईल अशी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 121 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे 43 धावांनी सामना जिंकला. ऑस्ट्र्लियाने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन सोफीने बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला पार 200 मजल मारेल, असं वाटत होतं. मात्र विंडीजच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या फक्त दोघींनीच दम दाखवला. तर इतरांनी गुडघे टेकले. बेथ मुनी आणि एलिसा पेरी या दोघींव्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.

बेथ मुनीची कडक खेळी

बेथ मुनी हीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या. बेथने 55 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह 79 धावांची खेळी केली. तर एलिसा पेरी हीने 32 चेंडूत 36 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनी निराशा केली. विंडीजसाठी डिंएन्ड्रा डॉटीन हीने सर्वाधिक 3 विकट्स मिळवल्या.

विंडीजची बॅटिंग

विंडीजने विजयी धावांचा पाठलाग करताना शेवटपर्यंत लढा दिला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. विंडीजसाठी ओपनर कियाना जोसेफ हीने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर स्टेफनी टेलर हीने 28 धावांचं योगदान दिलं. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

दुसरा सामना कधी आणि कुठे?

दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा शनिवारी 21 मार्च रोजी होणार आहे. सामन्याचं आयोजन हे सेंट व्हिन्सेंटमधील किंग्जटाउन इथे आर्नोस व्हेल ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची मालिका आहे. त्यामुळे विंडीजला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत विंडीजला विजय मिळवावा लागणार आहे.

Follow Us