IND W vs IRE W 3rd ODI : वूमन्स टीम इंडियाकडून 72 तासांत रेकॉर्ड ब्रेक, आयर्लंडसमोर 436 धावांचं आव्हान

Womens India Highest Total In Odi History : प्रतिका रावल आणि कॅप्टन स्मृती मानधना या दोघींनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इतिहास घडवला. वूमन्स टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध 435 धावांचा डोंगर उभारला.

IND W vs IRE W 3rd ODI : वूमन्स टीम इंडियाकडून 72 तासांत रेकॉर्ड ब्रेक, आयर्लंडसमोर 436 धावांचं आव्हान
smriti mandhana and pratika rawal women team india
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Jan 15, 2025 | 3:36 PM

भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. वूमन्स टीमने वनडे क्रिकेटमधील चौथी सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. टीम इंडियाने आयर्लंडसमोर 436 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 435 धावा केल्या. टीम इंडियासाठी प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या दोघांनी शतकी खेळी केली. या दोघींनी केलेल्या या खेळीच्या जोरावर महिला ब्रिगेडला पहिल्यांदाच 400 पार मजल मारता आली. प्रतिका रावल हीने 154 धावांची खेळी केली. तर स्मतीने 135 धावांचं योगदान दिलं. तसेच ऋचा घोष आणि इतर सहकाऱ्यांनीही त्यांचं योगदान दिलं. आता भारतीय गोलंदाज आयर्लंडला किती धावांवर रोखतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. स्मृती आमि प्रतिका या सलामी जोडीने विस्फोटक सुरुवात केली. या दोघींनी 233 धावांची भागीदारी केली. स्मृतीने 80 बॉलमध्ये 135 धावांची खेळी केली. स्मृतीने या दरम्यान 12 चौकार आणि 7 षटकार लगावले. स्मृतीनंतर प्रतिका रावल हीने शतक पूर्ण केलं.

प्रतिका रावलचा झंझावात

प्रतिका रावल हीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांच योगदान दिलं. प्रतिकाने 129 बॉलमध्ये 154 धावा केल्या. प्रतिकाने 20 चौकार आणि 1 षटकारासह 154 धावांची विक्रमी खेळी केली. तसेच ऋचा घोष हीने अर्धशतकी खेळी केली. ऋचाने 42 बॉलमध्ये 10 फोर आणि 1 सिक्ससह 59 रन्स केल्या. तेजल हसबनीस हीने 25 बॉलमध्ये 28 रन्स जोडल्या. तर हर्लीन देओल हीने 15 धावा केल्या.

दरम्यान टीम इंडियाने अवघ्या 72 तासांच्या आता स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकिदवसीय सामन्यात 12 जानेवारीला 370 धावा केल्या होत्या. टीम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. मात्र अवघ्या काही तासांतच महिला ब्रिगेडने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला.

आयर्लंडसमोर 436 धावांचं आव्हान

वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, सायली सातघरे, मिन्नू मणी, तनुजा कंवर आणि तितस साधू.

वूमन्स आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, फ्रेया सार्जेंट आणि अलाना डालझेल.