AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs SLA : भारताची फायनलमध्ये धडक, मुंबईकर कर्णधाराच्या नेतृत्वात श्रीलंकेवर मात

India A vs Sri Lanka A Women, Semi Final 1 Match Result : कॅप्टन राधा यादव हीने बॉलिंग आणि बॅटिंगने दिलेल्या दुहेरी योगदानच्या जोरावर भारतीय महिला संघाने सहज अंतिम फेरीत धडक दिली.

INDA vs SLA : भारताची फायनलमध्ये धडक, मुंबईकर कर्णधाराच्या नेतृत्वात श्रीलंकेवर मात
India A Womens Asia Cup Rising Stars 2026Image Credit source: Acc X Account
| Updated on: Feb 20, 2026 | 5:49 PM
Share

राधा यादव हीच्या नेतृत्वात इंडिया ए वूमन्स टीमने एमर्जिंग आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. वूमन्स इंडिया टीमने बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपांत्य फेरीतील या सामन्यात श्रीलंका ए वूमन्स टीमवर एकतर्फी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 19.4 ओव्हरमध्ये 118 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताने 119 धावांचं आव्हान 39 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 13.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात विजयी आव्हान पूर्ण करत अंतिम फेरीत धडक दिली. इंडिया ए वूमन्स टीमची फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. मुंबईकर कर्णधार राधा यादव भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. राधाने बॉलिंगसह बॅटिंगनेही या विजयात प्रमुख योगदान दिलं. राधाला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सामन्यात काय झालं?

श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना त्यांच्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी चिवट बॉलिंग केली. भारताच्या चिवट माऱ्यासमोर श्रीलंकेने 6 च्या रन रेटने धावा केल्या. भारताने श्रीलंकेला 19.4 ओव्हरमध्ये 118 रन्सवर ऑलआऊट केलं.

श्रीलंकेसाठी 4 फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. ओपनर संजना काविंदी हीने सर्वाधिक धावा केल्या. संजनाने 35 बॉलमध्ये 5 फोरसह 31 रन्स केल्या. शशिनी गिम्हाणी हीने 22 धावांचं योगदान दिलं. हंसिमा करुणारत्ने हीने 14 धावा केल्या. तर सथ्या संदीपानीने 15 धावांची भर घातली. भारतासाठी कर्णधार राधा यादव हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. राधाने 3.4 ओव्हरमध्ये 19 धावांच्या मोबदल्यात ही कामगिरी केली. तसेच प्रेमा रावत आणि तनुजा कंवर या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर साईमा ठाकोर आणि मिन्नू मणी या दोघांनी श्रीलंकेच्या 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

महिला ब्रिगेडचा जबरदस्त विजय

टीम इंडियाचा सहज विजय

भारताच्या विजयात पुन्हा एकदा वृंदा दिनेश हीने बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. वृंदाने सर्वाधिक 42 धावा केल्या. नंदीनी कश्यप हीने 13 धावा केल्या. अनुष्का शर्मा हीने 27 धावांची खेळी केली. तर बॉलिंगने धमाका केल्यानंतर राधा यादव हीने बॅटिंगने चमक दाखवली. राधाने नाबाद खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवलं. राधाने 18 बॉलमध्ये 7 फोरसह नॉट आऊट 31 रन्स केल्या.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...