
मुंबई : वर्ल्ड कप 2023 आधी सर्व संघांचे सराव सामने सुरू आहेत. या सामन्यांमध्येही पाऊस खोडा घालत असल्याचं दिसत आहे. सामन्यांमधील ओव्हर कमी करून सामने खेळवले जात आहेत. कारण वर्ल्ड कपआधी सर्व संघांचे सराव सामने झाले पाहिजेत. आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सराव सामना हैदराबामध्ये सुरू आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपली इज्जत हाताने काढली आहे. कायम फिल्डिंगमुळे ट्रोल होणाऱ्या पाकिस्तान संघाने परत एकदा हसू करून घेतलं आहे. भारताचा खेळाडू शिखर धवन यानेही हा व्हिडीओ शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत होता, सामन्याच्या 23 व्या ओव्हरमध्ये हॅरिसस रॉफ याच्या गोलंदाजीवेळी कांगारूंचा मार्नस लाबुशेन फलंदाजी करत होता. लाबुशेन याने डीप स्केअर लेगच्या दिशने बॉल मारला. त्यावेळी मोहम्मद नवाज आणि मोहम्मद वसीन बॉल पकडण्यासाठी गेले. मात्र दोघांनाही अंदाज आला नाही आणि बॉल बाऊंड्रीकडे गेला दोन्ही खेळाडूंना वाटलं की हा नाहीतर तो चेंडू पकडेल मात्र कोणीच बॉस अडवला नाही. ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे चार धावा गेल्या.
Pakistan & fielding never ending love story 🥰😄😄 #PakistanFielding #PakCricket pic.twitter.com/AJzT90hgNM
— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 3, 2023
नवाज आणि वसीम यांनी केलेल्या चुकीनंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघाला ट्रोल केलं जात आहे. आधीच फिल्डिंगमुळे किकेट विश्वात त्यांच्यावर खराब फिल्डिंगचा डाग लागलेला आहे. मात्र तरीसुद्धा पाकिस्तानच्या खेळाडूंनी माती खायची ती खाल्लीच. पाकिस्तान संघाचा रेकॉर्ड पाहिलात तर वर्ल्ड कप 2011 नंतर पाकिस्तान संघाने सर्वाधिक झेल सोडलेत. दहा ते बारा नाहीत तर तब्बल 59 झेल पाकिस्तान संघाने आहेत. त्यानंतर या यादीमध्ये श्रीलंका संघाचा दुसरा नंबर आहे.
दरम्यान, पाकिस्तान संघाने अशी चूक वर्ल्ड कप मध्ये गेली तर त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. कारण न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत तुल्यबळ संघासमोर अशा चूका घातक ठरू शकतात. मात्र आजच्या सराव सामन्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.