WTC Points Table: बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत भारताचं केलं नुकसान, चार देशांना टाकलं मागे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 स्पर्धेतील कसोटी मालिका पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात पार पडली. हा मालिका बांगलादेशने 2-0 ने जिंकली. या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. या पराभवाचा भारताला फटका बसला आहे.

WTC Points Table: बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत भारताचं केलं नुकसान, चार देशांना टाकलं मागे
WTC Points Table: बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत भारताचं केलं नुकसान, चार देशांना टाकलं मागे
Image Credit source: Bangladesh Cricket Twitter
| Updated on: May 20, 2026 | 5:03 PM

ICC WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागणार आहे. असं असताना बांगलादेशने एका दगडात दोन पक्षी मारले आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात पार पडली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. या कामगिरीमुळे बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत कमाल केली आहे. इतकंच काय भारताला बांगलादेशच्या विजयाचा फटका बसला आहे. कारण बांगलादेशने या विजयासह गुणतालिकेत मोठा उलटफेर केला आहे. बांगलादेशने पाकिस्तानसह भारताचं नुकसान केलं आहे. इतकंच काय तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या बलाढ्य संघाच्या पुढे निघून गेला आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 4 देशांना मागे टाकत पाचवं स्थान गाठलं आहे.

बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. बांगलादेशने चार पैकी दोन सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ केला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 58.33 इतकी झाली आहे. तर भारताने 9 सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात विजय, चार सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ केला आहे. भारताची विजयी टक्केवारी 48.15 असून सहाव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा 4 सामने खेळला आहे. त्यापैकी तीन सामने गमावले आणि एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 8.33 असून आठव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया 87.50 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 77.78 विजयी टक्केवारी दुसऱ्या, दक्षिण अफ्रिका 75 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या आणि श्रीलंका 66.67 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ 31.67 टक्के विजयी टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिज या गुणतालिकेत तळाशी आहे. वेस्ट इंडिजची विजयी टक्केवारी 4.17 इतकी आहे.

Follow Us