चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असतानाच भारताच्या या स्टार क्रिकेटरला मोठा धक्का, बायकोनं दिला घटस्फोट?

टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. मिडिया रिपोर्ट्स नुसार या दोघांनी बांद्रा फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटाची औपचारिकता पूर्ण केली.

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असतानाच भारताच्या या स्टार क्रिकेटरला मोठा धक्का, बायकोनं दिला घटस्फोट?
Dhanshree verma and Yuzvendra Chahal
| Updated on: Feb 20, 2025 | 8:10 PM

टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. मिडिया रिपोर्ट्स नुसार या दोघांनी बांद्रा फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटाची औपचारिकता पूर्ण केली. गेल्या काही महिन्यांपासून चहल आणि धनश्री हे दोघं वेगळे होणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.ते दोघे वेगवेगळे राहात होते. अखेर आता त्यांनी घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली आहे. धनश्री आणि युजवेंद्र चहल यांनी 22 डिसेंबर 2020 ला लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला चार वर्ष झाले होते. चार वर्षांमध्येच त्यांनी आता घटस्फोट घेतला आहे.

युजवेंद्र चहलची पोस्ट व्हायरल

युजवेंद्र चहल याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवरून असा अंदाज लावला जात आहे की , चहलच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडलं आहे. चहल याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी जेव्हा वाचू शकत होतो, त्यापेक्षा अधिक मला देवानं वाचवलं आहे. दरम्यान दुसरीकडे धनश्री वर्माने देखील काहीशी अशीच पोस्ट केली आहे. देव तुमच्या आयुष्यात ज्या चिंता असतात त्यांना कसं आनंदाच्या क्षणात बदलतो.तुम्ही जर एखाद्या गोष्टीमुळे टेन्शनमध्ये असाल तर जाणून घ्या की त्यासाठी तुमच्या आयुष्यात दुसरा पर्याय असतो. दरम्यान अशी देखील एक बातमी समोर आली आहे की, घटस्फोटानंतर चहल धनश्रीला तब्बल 60 कोटी रुपये पोटगी म्हणून देणार आहे. मात्र या बातमीला अद्याप पुष्टी मिळू शकलेली नाहीये.

चहल घटस्फोट घेणारा तिसरा भारतीय क्रिकेटर

गेल्या दोन वर्षात तीन भारतीय क्रिकेटरचा घटस्फोट झाला आहे. सर्वात आधी शिखर धवनचा आणि आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टान्कोविच यांचा घटस्फोट झाला तर आता युजवेंद्र चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. दुसरीकडे अशी देखील बातमी येत आहे की, भारताचा माजी स्टार फलंदाज सेहवागच्या आयुष्यात देखील असंच काहीसं सुरू आहे, तो देखील आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेणार आहे.