Dinesh Karthik : 18 वर्षांच्या कारकिर्दीत दिनेश कार्तिकची पहिल्यांदा गोलंदाजी, व्हिडिओ झाला व्हायरल

आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 122 धावा केल्या. यादरम्यान विराटने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

Dinesh Karthik : 18 वर्षांच्या कारकिर्दीत दिनेश कार्तिकची पहिल्यांदा गोलंदाजी, व्हिडिओ झाला व्हायरल
18 वर्षांच्या कारकिर्दीत दिनेश कार्तिकची पहिल्यांदा गोलंदाजी, व्हिडिओ झाला व्हायरल
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 09, 2022 | 5:20 PM

दुबईत (Dubai) भारत (India) आणि अफगाणिस्तान (Afganistan) यांच्यातील आशिया कप सुपर-4 च्या पाचव्या सामन्यात दिनेश कार्तिक पहिल्यांदा गोलंदाजी करताना दिसला. कार्तिकने वयाच्या 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच गोलंदाजी केली. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर दिनेश कार्तिक कायम विकेट किपर असतो. पण काल त्याने गोलंदाजी केली त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे कार्तिकने काल शेवटचं शतक टाकलं आहे.

कार्तिकच्या गोलंदाजीचं सगळीकडं कौतुक

आशिया चषकात काल झालेल्या सामन्यात कर्णधार केएल राहुल होता. त्याने काल सामन्यातील अंतिम 20 वे षटक दिनेश कार्तिकला दिले. त्याच्या षटकात एकूण 18 धावा आल्या. दिनेश कार्तिक काल पहिल्यांदा गोलंदाजी करीत असल्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती होत्या. पहिल्या चेंडूवर दोन धावा दिल्या. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकले. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दोन धावा आल्या आणि सहाव्या चेंडूवर एकही धाव आली नाही.

विराट कोहलीचं दमदार शतक

आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 122 धावा केल्या. यादरम्यान विराटने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. विराटने स्वत: या शतकानंतर सांगितले की, त्याचे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक या फॉरमॅटमध्ये होईल असं मला सुध्दा वाटतं नव्हतं.