
ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिन रुग्णालयात दाखल आहे. तिथे त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने हे वृत्त दिलं आहे. डेमियन मार्टिनला ताप आला होता. त्यावर उपचार सुरु असताना तो कोमामध्ये गेला. डेमियन मार्टिन ऑस्ट्रेलियाकडून 14 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने त्याच्या संपूर्ण क्रिकेट करिअरमध्ये एकूण 54 शतक झळकावली. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्र द सिडनी मॉर्निंग हेराल्डने माजी विकेटकिपर एडम गिलख्रिस्टच्या हवाल्याने डेमियन मार्टिन रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. द सिडनी मॉर्निंग हेराल्ड नुसार डेमियन मार्टिनला रुग्णालयात ताप आला म्हणून दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी औषधांच्या Reaction मुळे तो कोमात गेला. रिपोर्टनुसार मार्टिनच्या प्रकृतीवर डॉक्टरांच बारीक लक्ष आहे. तो पुढच्या काही दिवसात कोमामधून बाहेर येईल अशी अपेक्षा आहे.
मार्टिनला चांगले उपचार मिळतायत असं एडम गिलख्रिस्टने सांगितलं. मार्टिनचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करतायत. फॅन्सशिवाय मार्टिन सोबत क्रिकेट खेळलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील दिग्गज सुद्धा तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी कामना करतायत. त्याला काही खेळाडूंनी सोशल मीडियावरुन लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आठवड्याभरापासून आजारी
द गार्जियनच्या रिपोर्टनुसार डेमियन मार्टिन आठवड्याभरापासून आजारी होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिपोर्टनुसार डेमियन मार्टिन सध्या रुग्णालयात आयुष्याची लढाई लढत आहे.
Lots of love and prayers sending @damienmartyn way . Keep strong and fighting legend . Love to the family xxx 🙏 ❤️
— Darren Lehmann (@darren_lehmann) December 30, 2025
23 हजारपेक्षा जास्त धावा
डेमियन मार्टिन 1991-92 पासून 2010 पर्यंत ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तो 509 सामने खेळला. यात 23 हजारपेक्षा जास्त धावा आणि 54 शतकं झळकावली. मार्टिनने 10 सेंच्युरी लिस्ट ए च्या मॅचेसमध्ये झळकवल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 44 शतकं ठोकली. डेमियन मार्टिन आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण 279 सामने खेळला. यात त्याने 10 हजार धावा आणि 18 सेंच्युरी मारल्या. मार्टिनने टेस्टमध्ये 13 आणि वनडे मध्ये 5 शतकं झळकावली आहेत.