David Warner: डेव्हिड वॉर्नर कायद्याच्या कचाट्यात, एका चुकीमुळे अडचणीत वाढ, 9 महिन्यांची जेल होणार, प्रकरण काय?
ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला वर्षाच्या सुरुवातीला मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा कबूल केला होता. आता न्यायालयाने त्याला दोषी मानले आहे आणि शिक्षा सुनावली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एप्रिलमध्ये सिडनीमध्ये अचानक घेतलेल्या ब्रेथ टेस्टसाठी थांबवल्यानंतर मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला नऊ महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. बीबीसीच्या वृत्तानुसार, वॉर्नरचे वकील बॉबी हिल यांनी या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने गुन्हा कबूल केल्याची पुष्टी केली आहे. 5 एप्रिल 2026 रोजी सिडनीच्या पूर्व उपनगरात रस्त्याच्या कडेला घेतलेल्या ब्रेथ टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्याने वॉर्नरवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला मारुब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेले, जिथे त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 0.104 होते, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा दुप्पट होते.
हिल यांनी न्यायालयाला सांगितले की, दोन्ही पक्ष तथ्यांवर चर्चा करत आहेत. त्यांच्या मते, उबर घेण्याऐवजी स्वतःच्या गाडीत बसणे हा एक अविचारी आणि मूर्खपणाचा निर्णय होता. त्याच्या वकिलाच्या मते, त्याचा गुन्हा ‘प्लॅन बी’ ऐवजी ‘प्लॅन ए’ निवडण्याशी संबंधित आहे. वॉर्नरला 18 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षा सुनावण्यात येईल. त्याला किमान सहा महिन्यांची वाहन चालवण्यावर बंदी, 2,200 ऑस्ट्रेलियन डॉलर्सपर्यंतचा दंड आणि कमाल नऊ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
आपल्या याचिकेत वॉर्नरच्या वकिलाने म्हटले आहे, “तुम्ही व्यावसायिक असाल, डॉक्टर असाल किंवा जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असाल, याने काही फरक पडत नाही. हा धोका आपल्या सर्वांसाठी आहे.” अशाप्रकारे, वॉर्नरने दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकरणात आपला गुन्हा कबूल केला. इतकेच नाही, तर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, निवृत्तीनंतर वॉर्नर जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर यापूर्वी अनेक मोठ्या वादांमध्ये अडकला आहे. दक्षिण आफ्रिकेतील चेंडू छेडछाड प्रकरणामुळे 2018 मध्ये त्याच्यावर 12 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला असे आढळून आले की, त्याने सँडपेपर वापरून चेंडूची स्थिती बदलण्याचा कट रचला होता. या घटनेनंतर, त्याला राष्ट्रीय संघातील कोणत्याही नेतृत्वाच्या भूमिकेसाठी कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात आले. बर्मिंगहॅममधील एका घटनेदरम्यान इंग्लंडचा फलंदाज जो रूटला ठोसा मारल्याबद्दल 2013 मध्ये वॉर्नरला निलंबित करण्यात आले होते.