Virender Sehwag : ‘मी जेथून येतो, तिथे 50 गावांमध्ये गँगस्टर…’, वीरेंद्र सेहवागचा का चढला पारा! खळबळजनक विधानानंतर…
Virender Sehwag : भारतीय क्रिकेट टीमचा माजी क्रिकेटर आता त्याच्या खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे... 'मी ज्या भागातून येतो, तेथील 50 गावांमध्ये गँगस्टर...', असं विधान सेहवाग याने केलं आहे. तर जाणून सेहवाग असं म्हणाला तरी का?

Virender Sehwag : माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आता सामने खेळत नसला तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील सेहवाग याने केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, रियेलिटी शो ‘राइज एंड फॉल 2’ शोचा होस्ट विरेंद्र सेहवाग याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या ‘राइज एंड फॉल 2’ शोमध्ये स्पर्धकांचे वाद टोकाला पोहोचताना दिसत आहेत. विशेषतः बिहार येथील इन्फ्लुएन्सर मनीष कश्यप आणि गौतम गुलाटी यांच्यामध्ये… दोघांमध्ये कायम वाद होताना दिसत आहेत. दोघे सर्वांसमोर एकमेकांना अपशब्द वापरताना दिसत आहेत. शोमध्ये मनीष याने गौतम याला धमकी देखील दिली आहे. यावर ‘वीकेंड पावरप्ले’मध्ये गौतम आणि मनीष यांना होस्ट विरेंद्र सेहवाग याने चांगलंच सुनावलं आहे. मनीष कश्यपचं असं वर्तन पाहून वीरेंद्र सेहवागचा पारा चढला आणि त्याने त्या इन्फ्लुएन्सरला कडक शब्दांत फटकारलं.
मी ज्या भागातून येतो, तेथे गोळ्या झाडल्या जातात – वीरेंद्र सेहवाग
मनीष याला फटकारत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘तुला माहिती आहे मी कोणत्या भागातून येतो? दिल्लीत एक छोटा भाग आहे, ज्याचं नाव नजफगड असं आहे. नजफगड मध्ये जवळपास 100 गाव आहेत आणि त्या 100 गावांपैकी 50 गावांमध्ये फक्त गँगस्टर राहतात. जुन्या नोंदींवर नजर टाकली, तर तुम्हाला अशा बातम्यांच्या हेडलाईन्स दिसतील ज्यात एका गुंडाने दुसऱ्याची हत्या केल्याचा उल्लेख आहे. पण मी कुठून आलो आहे, असं मी कधी सांगितल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? ज्या भागातून मी येतो, तो भाग असा आहे जिथे गोळ्यांचा वर्षाव होतो… असा उल्लेख मी कधी केल्याचं तुम्ही ऐकले आहे का? ‘ असं विरेंद्र म्हणाला.
View this post on Instagram
मनीषचं यावर स्पष्टीकरण…
वीरेंद्र सेहवाग याच्या विधानावर स्पष्टीकरण देत मनीष म्हणाला, ‘सर मी आधीच सांगितलं होतं की, मी कोणाला शिव्या देणारन नाही. पण कोणाचं ऐकून देखील घेणार नाही.’ याचं उत्तर देत सेहवाग म्हणाला, ‘तर तू पुन्हा त्याच जागेवर जा, तू ऐकूच नको… यावर मनीष म्हणतो, ‘पहिल्यांदा जेव्हा गौतमने मला शिव्या दिलेल्या तेव्हा मी त्याला नकार दिला. पण जेव्हा दुसऱ्यांदा त्याने असं केलं, तेव्हा मी प्रतिक्रिया दिली.’, वीरेंद्र सहवाग याने समजावून सांगितल्यानंतरही जेव्हा गौतम आणि मनीष ऐकलं नाहीत आणि एकमेकांसोबत वाद घालत राहिले, तेव्हा हे पाहून वीरेंद्र सहवाग इतका संतापला की ते स्टेज सोडूनच निघून गेला. मात्र, नंतर परत येऊन त्यांनी शो पूर्ण केला.
शो मध्ये तहसीन पूनावाला यांची एन्ट्री
Rise and Fall 2 मध्ये लवकरच एका नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या एन्ट्रीची देखील चर्चा होत आहे. शोमध्ये तहसीन पूनावाला याने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आहे. वीरेंद्र सहवाग याने 28 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये तहसीन याची ओळख करून दिली. शोमध्ये तहसीन याचा भाऊ आणि राजकीय टिप्पणीकार शहजाद पूनावाला हे देखील स्पर्धक म्हणून दिसत आहेत, सांगायचं झालं तर, तहसीन पूनावाला स्पष्टवक्त्या राजकीय टिप्पण्यांसाठी ओळखला जातो. यापूर्वी ते सलमान खानच्या ‘बिग बॉस 14’ या रिॲलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसलेला.
