AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, पदवीधरमधील पराभव जिव्हारी, कुणाची विकेट पडणार? रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर

Ravindra Chavan in Action Mode: पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक खिशात घालणार्‍या भाजपला पदवीधरमध्ये मात्र पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर अमरावतीची जागा मित्रपक्ष शिंदे सेनेने पटकावली आहे. आता या हाराकिरीचे कवित्व आता रंगणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर आले आहेत.

मोठी बातमी, पदवीधरमधील पराभव जिव्हारी, कुणाची विकेट पडणार? रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर
पदवीधरमधील पराभव जिव्हारी, कुणाची विकेट पडणार? रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर
| Updated on: Oct 29, 2026 | 10:38 AM
Share

Graduate Constituency Election Result: विधान परिषदेच्या 5 जागांपैकी पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा तेवढी भाजपला राखता आली. तर पदवीधर मतदारसंघात पक्षाचे पार पानीपत झाले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाचा किल्ला मित्र पक्ष शिवसेनेने लढला आणि जिंकला. पण पदवीधरच्या तीन मतदारसंघातील हाराकिरी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यात नागपूरमधील पराभव भाजपच्या दुखत्या रगीवर, जखमेवर बोट ठेवल्यासारखा झाले आहे. या पराभवाचे कवित्व सुरू झाले आहे. आता खापर कुणावर फुटणार हे सुद्धा समोर आले आहे.

पराभवाचे कवित्व, सर्व जिल्ह्यांचा लेखाजोखा घेणार

पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. आता या पराभवाची समीक्षा सुरू झाली आहे. नागपूर आणि पुण्यातील पराभवाची कारणं शोधण्यात येणार आहे. पक्ष संघटन आक्रमक झाले आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये भाजपची विकेट पडल्याने आता अनेक पदाधिकाऱ्यांच्या विकेट पडतील असा अंदाज आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर आले आहेत. नागपूर व पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा लेखाजोखा ते घेणार आहेत.

या जिल्ह्यांचा आढावा घेत होणार कारवाई

पुणे पदवीधर मतदारसंघ

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

नागपूर पदवीधर मतदारसंघ

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली

भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेणार

पदवीधरमधील पराभवानंतर भाजप संघटन आक्रमक झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्हाध्यक्ष, आमदार व मंत्री यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चव्हाण हे येत्या 2 नोव्हेंबरला भेट घेणार आहेत.

मित्रपक्षाच्या भूमिकेवरही भाष्य

दरम्यान आता पराभवाचे खापर फोडण्यास सुरुवात झाली आहे. नागपूरमधील पराभव हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांची घरी जाऊन समजूत काढली होती. ते प्रचारात उतरले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरारीने प्रचार केला होता. तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते. तरीही होमटाऊनमध्ये विकेट पडली. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला.

आता भाजपने या पराभवाचे खापर मित्रपक्षावर फोडले आहे. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर निवडणुकीत, पुणे पदवीधर मतदारसंघात शिंदे सेनेवर खापर फोडण्यात आले आहे. तर पराभवाची समीक्षा करताना महायुतीच्या मित्र पक्षांनी घेतलेल्या भूमिकेबाबत ही प्रदेशाध्यक्ष अहवाल देणार आहेत. पराभवाचे संपूर्ण विश्लेषण चव्हाण हे शाहांसमोर मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन