IND vs AFG : हार्दिक पंड्याला मोठा धक्का, अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून पत्ता कट

Hardik Pandya ruled out : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करूनही, त्याला घोट्याला दुखापत झाल्याने मालिका सोडावी लागली. 14 महिन्यांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची त्याची संधी या दुखापतीमुळे हुकली आहे. त्याला आता पुढील दोन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल.

IND vs AFG : हार्दिक पंड्याला मोठा धक्का, अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून पत्ता कट
हार्दिक पांड्या
| Updated on: Jun 10, 2026 | 12:03 PM

Hardik Pandya,IND vs AFG : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. हार्दिकने फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच त्याला बाहेर पडावं लागल्याची बातमी समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या (TOI) वृत्तानुसार, हार्दिकच्या पायाला दुखापत झाली आहे, त्याचा पाय मुरगळला असून त्यामुळेच त्याला या मालिकेला मुकावं लागणार आहे. या दुखापतीमुळे हार्दिकला कदाचित आणखी दोन आठवडे बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये घालवावे लागतील.

हार्दिकचा पाय मुरगळला, वनडेतून बाहेर

येत्या 13 तारखेपासून, म्हणजेच 13 जूनपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. 11 जून रोजी हार्दिक पंड्या हा भारतीय संघात सामील होणार होता; मात्र, त्याचा पाय मुरगळल्यामुळे आता त्याचं आगमन आणखी विलंबाने होईल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला ही माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिकला झालेली दुखापत ही ती ‘लो-ग्रेड’ (सौम्य स्वरूपाची) आहे; विशेषतः त्याचा पायाला मुरगळला (sprain) आहे. मात्र, ही दुखापत दीर्घकाळ टिकणारी नसेल असे मानले जात आहे. त्याची ही दुखापत बळावू नये म्हणून वैद्यकीय पथकाने हार्दिकला पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

14 महिन्यांनी होणार होतं पुनरागमन वापसी पण …

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून हार्दिक पांड्या 14 महिन्यांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र, आता दुखापतीमुळे त्याचं खेळणं शक्य नसल्याने, त्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. एकदिवसीय संघातील हार्दिकला वगळल्यानंतर, बीसीसीआय त्याच्या जागी कोणत्या खेळाडूची घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिली वनडे मॅच 13 जून रोजी होणार असून त्यानंतर दुसऱ्या मॅचसाठी दोन्ही संघ लखऊला जातील. तेथे 17 जून रोजी दुसरी मॅच होईल. तिसरी आणि शेवटची वनडे मॅच ही 20 जून रोजी चेन्नई येथे होणार आहे.

Follow Us