Sanjay Manjrekar on Dhoni : तो खेळला काय, नाय खेळला काय, मला नाही फरक पडत.. धोनीबद्दल संजय मांजरेकर जे बोलले..

भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकर आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडलेले दिसतात. यावेळी त्यांनी महेंद्रसिंग धोनीबद्दल एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे चाहते नाराज होण्याची शक्यता आहे. असं काय म्हणाले संजय मांजरेकर ?

Sanjay Manjrekar on Dhoni : तो खेळला काय, नाय खेळला काय, मला नाही फरक पडत.. धोनीबद्दल संजय मांजरेकर जे बोलले..
महेंद्रसिंग धोनी- संजय मांजरेकर
| Updated on: May 19, 2026 | 10:44 AM

इंडियन प्रीमिअर लीग 2026 मध्ये सोमवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धची मॅच होण्यापूर्वी, महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्सकडून सामना खेळणार की नाही याबद्दलच्या चर्चांन चांगलाच वेग आला होता. याचं कारण म्हणजे आयपीएलच्या सीझनमधील चेन्नईचा हा शेवटचा सामना होता. महेंद्रसिंग धोनी, या सीझनमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळला नव्हता. त्यामुळ काल घरच्या प्रेक्षकांसमोर खेळला जाणारा हा सामना, त्याचा निरोपाचा सामना मानला जात होता. मात्र सामना खेळण्यासाठी तो तंदुरुस्त नव्हता, असं कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितलं. धोनी या सामन्यातही खेळताना दिसला नाहीच.

याच पार्श्वभूमीवर आता भारताचा माजी फलंदाज आणि कॉमेंट्रेटर संजय मांजरेकर यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. संजय मांजरेकर यांनी चेन्नई सुपर किंग्सवर आरोप लावला आहे. एम.एस. धोनीने निर्माण केलेल्या
नावाची योग्य प्रकारे जपणूक न केल्याचा आणि “संपूर्ण संघच बिघडवून टाकल्याचा” आरोप मांजरेकर यांनी केला. एवढंच नव्हे तर ते पुढे असंही म्हणाले की, “आता धोनीला Indian Premier League मध्ये फेअरवेल सामना मिळतो की नाही, याने त्यांना काहीही फरक पडत नाही”. धोनीचा वारसा डागाळला आहे, असं विधानही त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

मला काही फरक पडत नाही

एम.एस. धोनी हा धोनी आयपीएलमधील सर्वात महान कर्णधारांपैकी एक मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून तो आयपीएलमधून निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलत आहे. याचबद्दल मांजरेकर बोलले. “जर तुम्हाला माझ्याकडून अगदी छोटं आणि प्रामाणिक उत्तर हवं असेल, तर मला काही फरक पडत नाही. तो खेलळला काय किंवा न खेळला काय, त्याने काहीही फरक पडत नाही. हो, CSK ने ही परिस्थिती खूप वेगळ्या पद्धतीने हाताळली आहे.आता माझा त्यातला रस संपलाय” असं थेट विधान मांजरेकर यांनी केलंय.

पुढे मांजरेकर यांनी धोनीच्या भारतीय संघातील आणि CSK मधील वारशामध्ये स्पष्ट फरक असल्याचे सांगितले. “त्याने भारतासाठी जे काही केलं, ते मला रोज रात्री आठवतं. तो माझा आवडता कर्णधार आहे आणि तो सर्वकालीन महान कर्णधारांपैकी एक आहे. महेंद्रसिंह धोनीने जे साध्य केलं, त्याबद्दल, त्याच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण सध्याचा धोनी पूर्वीसारखे राहिलेला नाही. CSK ने धोनीच्या नावाचा खूप चुकीच्या पद्धतीने वापर केला. त्याचा परिणाम संपूर्ण संघावर झाला. धोनी शेवटचा सामना खेळतील की नाही, हे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि इतर लोकांसाठी महत्त्वाचं असेल. पण मला तोच धोनी लक्षात राही, जो मी भारतासाठी आणि सीएसकेसाठी (खेळताना) पाहिला. अगदी सर्वोत्तम काळातील धोनीने या संघाचं नेतृत्व केलं असतं, तरीही हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असता” असंही मांजरेकर म्हणाले.

Follow Us