AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Test Championship | लॉर्ड्स नाही तर ‘या’ ठिकाणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येण्याची शक्यता

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम सामना (ICC world test championship final) टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

World Test Championship | लॉर्ड्स नाही तर 'या' ठिकाणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येण्याची शक्यता
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम सामना (ICC world test championship final) टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
| Updated on: Mar 07, 2021 | 11:59 AM
Share

अहमदाबाद : टीम इंडियाने चौथ्या कसोटीत इंग्लंडवर (India vs England 4th test) डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 3-1 च्या फरकाने मालिका खिशात घातली. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (World Test Championship) धडक मारली. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या अंतिम सामन्यात टीम इंडिया न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. हा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर (Lords)  खेळवण्यात येऊ शकतो. पण याबाबत अजूनही निश्चितता नाही. हा अंतिम सामना लॉर्ड्स तसेच साउथम्प्टन या दोन्ही पैकी कोणत्याही मैदानात खेळवण्यात येऊ शकतो. (ICC world test championship final match venue are not confirm)

टाइम्स ऑफ इंडियानुसार , ICC ने अजूनही या अंतिम सामन्याबाबतचं ठिकाण निश्चित नाही. तर क्रिकबझनुसार हा सामना लॉर्ड्सऐवजी साउथम्प्टन मध्ये आयोजित केला जाऊ शकतो.

साउथम्प्टनचं नाव आघाडीवर

हा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान पार पडणार आहे. या सामन्याच्या आयोजनसाठी सर्वांचीच लॉर्ड्सला पंसती होती. तसेच मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड आणि बर्मिंघममधील एजबस्टेन स्टेडियम या सामन्याच्या यजमानपदाच्या स्पर्धेत होते. पण या दोन्ही स्टेडियमच्या तुलने साउथम्प्टनमध्ये सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत. यामुळे साउथम्प्टनचे नाव आघाडीवर आहे.

अत्याधुनिक सुविधा

साउथम्प्टन स्टेडियमला लागून पंचतारांकित हॉटेल आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये खेळाडूंची बायोबबलच्या सुरक्षित राहण्याची सोय होईल. यामुळे त्यांचा अनावश्यक प्रवासाचा वेळही वाचेल. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडने साउथम्प्टनमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचे यशस्वीरित्या आयोजन केलं होतं. साउथम्प्टनच्या एका अधिकाऱ्यांना या अंतिम सामन्याच्या आयोजनाबाबत प्रतिक्रिया दिली. “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याच्या आयोजनाबाबतीत मी फार काही बोलू शकत नाही. मात्र याबाबत चर्चा सुरु आहे.”

आयसीसीकडून लवकरच घोषणा

आयसीसीकडून अंतिम सामन्याच्या ठिकाणाचा तिढा लवकरच सोडवण्यात येणार आहे. आयसीसी हा अंतिम सामना कुठे खेळवण्यात येईल, याबाबत लवकरच घोषणा करणार आहे. त्यामुळे हा सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर रंगणार की आणखी कुठे, हे पाहणं औत्सुतक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

ICC Test ranking : इंग्लंडला धूळ चारत टीम इंडिया बनली जगातली नंबर वन टीम

India vs Engaland 4th Test Highlights | अश्विन-अक्षर फिरकी जोडीचा ‘पंच’, भारताचा इंग्लंडवर डाव आणि 25 धांवानी विजय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक

(ICC world test championship final match venue are not confirm)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...