ICC Test ranking : इंग्लंडला धूळ चारत टीम इंडिया बनली जगातली नंबर वन टीम

ICC Test ranking : इंग्लंडला धूळ चारत टीम इंडिया बनली जगातली नंबर वन टीम
भारतीय संघ

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात (india vs england 2021 4th) टीम इंडियाने डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला आहे.

अक्षय चोरगे

|

Mar 06, 2021 | 4:39 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात (india vs england 2021 4th) टीम इंडियाने डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला आहे. रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. अक्षर आणि अश्विन या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज फार वेळ टीकू शकले नाहीत. इंग्लंडचा दुसरा डाव या फिरकी जोडीने अवघ्या 135 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 135 धावा केल्या. यामुळे इंडियाचा 25 धावा आणि डावाने विजय झाला आहे. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. (ICC test rankings : India tops table after beating England in test series)

आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान

या मालिका विजयानंतर भारत आता आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. न्यूझीलंडला मागे टाकत भारताने हे स्थान मिळवले आहे. भारताने सलग दुसरी कसोटी मालिका जिंकली. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-1 असा पराभव केला होता. यापूर्वीही भारत प्रथम क्रमांकावर होता, परंतु फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने भारताला पराभूत करत पहिल्या क्रमांकाचा मुकुट काढून घेतला होता. पण भारत आता पुन्हा नंबर वनवर पोहोचला आहे.

इंग्लंड चौथ्या स्थानी कायम

इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत आणि न्यूझीलंडचे गुण समान होते. दोन्ही संघांकडे 118 गुण होते. परंतु इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकत भारताने पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं आहे. दुसऱ्या बाजूला 3-1 अशा फरकाने पराभूत होऊनही इंग्लंड संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. इंग्लिश संघ चौथ्या स्थानावर कायम आहे. परंतु त्यांचे गुण कमी झाले आहेत. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ 108 गुणांसह चौथ्या स्थानावर होता. या मालिका पराभवानंतर इंग्लंडचे गुण 105 झाले आहेत.

संबंधित बातम्या

VIDEO : विराट कोहलीच्या थ्रोने जो रुट विव्हळला, व्हिडीओ पाहून चाहतेही म्हणाले अरेरे…!

Video | सिराज आऊट झाला अन् सुंदरचं शतक हुकलं, मग सुंदरनं काय केलं? पाहा ‘हा’ व्हिडीओ

IPL 2021 Date And Schedule : आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरुवात, 30 मे रोजी फायनल, GC च्या शिक्क्याची प्रतीक्षा

(ICC test rankings : India tops table after beating England in test series)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें