Video | सिराज आऊट झाला अन् सुंदरचं शतक हुकलं, मग सुंदरनं काय केलं? पाहा ‘हा’ व्हिडीओ

वॉशिंग्टन सुंदरला ( washington sundar) इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेत दुसऱ्यांदा शतक झळकावण्याची संधी हुकली. दोन्ही वेळेस सोबतच्या खेळाडूंनी त्याला साथ न दिल्याने तो शतकापासून वंचित राहिला.

Video | सिराज आऊट झाला अन् सुंदरचं शतक हुकलं, मग सुंदरनं काय केलं? पाहा 'हा' व्हिडीओ
वॉशिंग्टन सुंदरला ( washington sundar) इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेत दुसऱ्यांदा शतक झळकावण्याची संधी हुकली. दोन्ही वेळेस सोबतच्या खेळाडूंनी त्याला साथ न दिल्याने तो शतकापासून वंचित राहिला.
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 2:34 PM

अहमदाबाद : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत फलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचं (washington sundar) पहिल्या शतकाचं स्वप्नन अधुरं राहिलं. सुंदर तिसऱ्या दिवशी 96 धावांवर नाबाद राहिला. बेन स्टोक्सने मोहम्मद सिराजला बोल्ड केल्याने टीम इंडियाचा पहिल्या डावातील खेळ 365 धावांवर आटोपला. सिराज बाोल्ड झाला. पण सुंदरचं शतक ठोकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. सुंदरने 174 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 96 धावा केल्या. शतक लगाण्याची संधी हुकल्याने सुंदर नाराज झालेला पाहायला मिळाला. त्याच्या निराशेचा व्हिडीओ अनेक नेटीझन्सनी शेअर केला आहे. (team india all rounder washington sundar missed first hundred by 4 runs against england 4th test)

नक्की काय झालं?

सुंदर आणि अक्षर पटेलने तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. 7 बाद 294 धावसंख्येवरुन खेळाची सुरुवात झाली. वॉशिंग्टन सुंदर (60*) आणि अक्षर पटेल (11*) धावांवर नाबाद होते. सुंदरला शतक तर अक्षरला अर्धशतकाची संधी होती. दोघांनी झोकात सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकी गोलंजदाज जॅक लीचच्या बोलिंगवर जोरदार फटकेबाजी केली. या दरम्यान दोघांमध्ये 106 धावांची शतकी भागीदारी झाली. दोघेही चांगले सेट झाले होते. पण चोरटी धाव घेण्याच्या नादात अक्षर 43 धावांवर रनआऊट झाला. अक्षरच्या रुपात भारताला 8 वा धक्का बसला. अक्षर बाद झाला तेव्हा सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर होता.

अक्षरनंतर इशातं शर्मा मैदानात आला इशांत आला तसाच बाहेर गेला. इशातंला बेन स्टोक्सने पहिल्याच चेंडूवर आऊट केलं. इशांतच्या रुपात टीम इंडियाने नववी विकेट गमाववली. त्यानंतर मोहम्मद सिराज मैदानात आला. सिराजने 2 चेंडूंचा सामना केला. सिराज सुंदरला स्ट्राईक मिळवून देणार असं वाटत होतं. पण तेव्हाच स्टोक्सने आपल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बोल्ड केलं. सिराज आऊट झाल्याने टीम इंडियाचा पहिला डाव 365 धावांवर आटोपला. सिराजच्या बाद झाल्याने नॉन स्ट्राईकर एंडवर असेलला सुंदर आपल्या शतकापासून 4 धावांनी वंचित राहिला. सुंदर 96 नाबाद धावांवर माघारी परतला.

सुंदर असा व्यक्त झाला…

सिराजच्या बाद झाल्याने सुंदरचं नुकसान झालं. सुंदरचा पहिल्या कसोटी शतकासाठीचा अंतर आणखी वाढलं. मैदाना बाहेर जाताना सुंदरने हवेत बॅट उंचावत प्रेक्षकांकडे पाहिलं. शतक अर्धवट राहिल्याची खंत सुंदरच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

एकाच मालिकेत दुसऱ्यांदा शतकापासून वंचित

सुंदर शतकापासून वंचित राहण्याची ही दुसरी वेळ ठरली. दुर्देवी योगायोग म्हणजे ही घटना इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेतच घडली. चेन्नईत खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत सुंदरल शतक लगावण्याची संधी होती. पण इतर सहकाऱ्यांनी त्याला साथ न दिल्याने त्याला शतकापासून वंचित राहावे लागले होते. एका मागोमाग एक खेळाडू बाद झाल्याने सुंदर 85 रन्सवर नॉट ऑऊट राहिला होता. सुंदरने 138 चेंडूत 2 सिक्स आणि 12 चौकारांसह नाबाद 85 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाचा पहिला डाव

दरम्यान पहिल्या डावात टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 101 धावांची खेळी केली. तर सुंदरने नाबाद 96 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे टीम इंडियाने 365 धावांपर्यंत मजल मारली. यासह टीम इंडियाने 160 धावांची आघाडी घेतली.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी

Washington Sundar | वॉशिंग्टनची नाबाद 82 धावांची ‘सुंदर’ खेळी, इतर खेळाडूंमुळे शतकाची संधी हुकली, नेटकऱ्यांकडून संताप

(team india all rounder washington sundar missed first hundred by 4 runs against england 4th test)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.