VIDEO : विराट कोहलीच्या थ्रोने जो रुट विव्हळला, व्हिडीओ पाहून चाहतेही म्हणाले अरेरे…!

इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान कर्णधार जो रुट 18 व्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना विराट कोहलीचा थ्रो एक टप्पा पडून रुटच्या अवघड जागी लागला. बॉल एवढा जोरात लागला की रुटला वेदना असह्य झाल्याने तो विव्हळला.

VIDEO : विराट कोहलीच्या थ्रोने जो रुट विव्हळला, व्हिडीओ पाहून चाहतेही म्हणाले अरेरे...!
joe Root Injured Due to Virat Kohli Throw
Akshay Adhav

|

Mar 06, 2021 | 4:12 PM

अहमदाबाद :  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यात मालिकेतली अखेरची कसोटी मॅच सुरु आहे. आजचा सामन्याच्या तिसरा दिवस आहे. दरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) एका थ्रो ने बॅटिंग करत असलेल्या इंग्लंडचा कर्णधार जो रुटला (Joe Root) नको त्या दुखापत झाली. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Ind Vs England 4 Th test Joe Root Injured Due to Virat Kohli Throw Video On Social Media Viral)

इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान कर्णधार जो रुट 18 व्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना विराट कोहलीचा थ्रो एक टप्पा पडून रुटच्या अवघड जागी लागला. बॉल एवढा जोरात लागला की रुटला वेदना असह्य झाल्याने तो विव्हळला.

लगोलग भारतीय खेळाडूंनी रुटच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस केली. कोहलीने त्याच्या हातावर हात मारत त्याची विचारपूस केली. याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. तर काही क्रिकेट फॅन्स या घटनेवर मजेशीर मिम्स बनवत आहेत.

पाहा व्हिडीओ :

चौथ्या कसोटीत दमदार विजय, मालिकाही जिंकली

दरम्यान आताच आलेल्या माहितीनुसार  टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत (india vs england 2021 4th) टीम इंडियाचा डाव आणि 25 धावांनी  विजय झाला आहे. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे.

अक्षर आणि अश्विन या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने लोटांगण घातलं. इंग्लंडचा दुसरा डाव या फिरकी जोडीने अवघ्या 135 धावांवर गुंडाळला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 135 सर्वबाद धावा केल्या. यामुळे इंडियाचा 25 धावा आणि डावाने विजय झाला आहे.

टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे.

(Ind Vs England 4 Th test Joe Root Injured Due to Virat Kohli Throw Video On Social Media Viral)

हे ही वाचा :

India vs Engaland 4th Test Day 3 Live | अश्विन-अक्षर फिरकी जोडीचा ‘पंच’, भारताचा इंग्लंडवर डाव आणि 25 धांवानी विजय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें