AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : फायनलमध्ये भारताला मात देण्यासाठी……, न्यूझीलंडच्या बोलरने पुन्हा टीम इंडियाला डिवचलं!

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्याअगोदर न्यूझीलंडला इंग्लंडबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. (tim Southee India vs New Zealand WTC Final 2021)

WTC Final : फायनलमध्ये भारताला मात देण्यासाठी......, न्यूझीलंडच्या बोलरने पुन्हा टीम इंडियाला डिवचलं!
टीम साऊथी आणि विराट कोहली
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 22, 2021 | 7:11 AM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 (WTC Final 2021) च्या अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करुन कसोटीतीलही वर्ल्ड कप जिंकायची नामी संधी आहे. हा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू उत्सुक आहेत. पण फायनलअगोदरच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी माइंड गेम सुरु केला आहे.  भारताला अंतिम सामन्यात हरविण्यासाठी आम्हाला इंग्लंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी  मालिका, हा मोठा मंच असेल. फायनलची तयारी आमची इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये होईल. जेणेकरुन अंतिम सामन्यात आम्ही भारताविरुद्ध चांगलं प्रदर्शन करु, असं म्हणत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने (Tim Southee) टीम इंडियाला डिवचलं आहे. (ICC World Test Championship New Zealand Pacer tim Southee India vs New Zealand WTC Final 2021)

WTC फायनलअगोदर न्यूझीलंड इंग्लंड भिडणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलअगोदर न्यूझीलंड आणि इंग्लंडचा संघ भिडणार आहे. न्यूझीलंडला इंग्लंडविरोधात दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला कसोटी सामना लॉर्ड्स इथे 2 जून ते 6 जून रोजी खेळवला जाईल तर दुसरा कसोटी सामना 10 ते 14 जूनदरम्यान खेळवला जाईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना 18 जूनला खेळविण्यात येणार आहे. भारत आणि न्यूझीलंड आमने सामने असतील.

फायनलअगोदर आम्हाला मोठी संधी

इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत पण न्यूझीलंडच्या खेळाडूंचं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलवर जास्त लक्ष आहे का? असा सवाल टीम साऊथीला करण्यात आला. यावेळी तो म्हणाला, “जेव्हाही न्यूझीलंडकडून तुम्हाला कसोटी सामने खेळण्याची संधी मिळते, तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. तेव्हा सराव म्हणून कुणी खेळत नाही. सगळे जीव लावून मॅच खेळत असतात. आता फायनलअगोदर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने आहेत. त्याच्यावर आमचं फोकस आहे. फायनलअगोदर आम्हाला मोठी संधी आहे.”

भारताला मात देण्यासाठी….

कसोटी क्रिकेटमध्ये 302 विकेट्स घेणाऱ्या 32 वर्षीय साऊथीने सांगितलं, “भारताविरुद्धच्या मोठ्या मॅचची तयारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांतून होईल. फायनलअगोदर आमच्यासाठी ही मोठी संधी असेल. फायनलमध्ये भारताला मात द्यायची असेल तर आम्हाला इंग्लंडविरोधात चांगलं प्रदर्शन करावं लागेल, म्हणूनच सध्या तरी आमचं लक्ष इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यांवर आहे”.

टीम साऊथीचा विराटला इशारा

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्याअगोदर न्यूझीलंडला इंग्लंडबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. तत्पूर्वी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी टीम साऊथीसह अन्य खेळाडूंबरोबर त्यांचे चाहते विमानतळावर फोटो घेत होते.

याचदरम्यान साऊथीच्या एका फॅन्सने विराटची विकेट घेऊ इच्छितोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ‘तसं झालं मला आनंद होईल’ असं सांगत विराटची विकेट घेण्यास तो किती आसुससा आहे, असंच साऊथीने सुचवलं. दुसरीकडे या माध्यमातून साऊथीने थेट विराटला डिवचल्याची चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये आहे.

(ICC World Test Championship New Zealand Pacer tim Southee India vs New Zealand WTC Final 2021)

हे ही वाचा :

Photo : हार्दिक पांड्याची 27 व्या वर्षी उंच भरारी, गुजरातमध्ये आलिशान घर; जीम, थिएटर आणि बरंच काही…!

जाडेजा-हार्दिकमुळे माझी आणि कुलदीप यादवची जोडी फुटली : युजवेंद्र चहल

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...