Photo : हार्दिक पांड्याची 27 व्या वर्षी उंच भरारी, गुजरातमध्ये आलिशान घर; जीम, थिएटर आणि बरंच काही…!

1/5
hardik Pandya
पाठीमागच्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या शानदार खेळाने क्रिकेट विश्वात चांगलं नाव कमावलंय. नावासोबत त्याच्या संपत्तीतदेखील चांगलीच भर पडलीय. गुजरातमधील वडोदऱ्यात त्याने 6 हजार स्केअर फूटचं पेंट हाऊस खरेदी केलंय. या पेंट हाऊसमध्ये एकापेक्षा एक सुविधा आहेत.
2/5
हार्दिक पांड्याचं बेडरुम खूपच आकर्षक आहे ज्यामध्ये शानदार फॅसिलिटी आहेत. बेड रुममध्ये त्याचे आवडते काही फोटोज आहेत. तसंच त्याच्या पत्नीच्या आवडीची रंगसंगती करण्यात आली आहे.
3/5
hardik Pandya
हार्दिक पांड्याच्या पेंट हाऊसमध्ये खूप मोठं गेस्ट रुम आहे. तिथे आरामदायक सोफे आहेत तसंच भलीमोठी टीव्ही स्क्रीन लावण्यात आली आहे. हार्दिकने आपल्या घरात अल्ट्रा मॉडर्म लिव्हिंग रुम बनवली आहे ज्यामध्ये तो त्याचा फावला वेळ व्यतित करतो.
4/5
hardik Pandya
हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या या दोघा बंधूंना देखील सिनेमाचं खूप वेड आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या सिनेमाच्या वेडापायी त्यांनी घरातच एक छोटं थिअटर करुन घेतलं आहे. ज्यामध्ये बसून सिनेमाचा आनंद घेता येईल.
5/5
hardik Pandya
हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसवर खूपच लक्ष केंद्रित करतो. टूर वर असताना तो अनेक वेळा जिम व्यायाम करताना नजरेस पडतो. घरी आल्यानंतर देखील तो त्याचा काही वेळ जीममध्ये घालवतो. यासाठी त्याने घरातच एक छोटी जीम तयार केली आहे.