
न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी टीमला दुहेरी झटका बसला. एक म्हणजे सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव आणि फखर जमांच दुखापतीमुळे बाहेर होणं. फखर जमांला न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात खेळताना दुखापत झाली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून तो OUT झाला आहे. फखर जमांच्या जागी ज्या खेळाडूचा पाकिस्तानी टीममध्ये समावेश झालाय, तो जास्त घातक आहे. फखरच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून इमाम उल हकची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानी टीममध्ये एन्ट्री होताच देशांतर्गत सामन्यात खेळताना इमाम उल हकने शानदार शतक झळकावलं. या द्वारे त्याने फॉर्ममध्ये असल्याचे पुरावे दिले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा पुढचा सामना भारताविरुद्ध आहे. या मॅचआधी शतक ठोकून इमाम उल हकने तो फक्त टीममध्येच नाही, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी सुद्धा दावेदार आहे, हे दाखवून दिलय.
पाकिस्तानातील देशांतर्गत टुर्नामेंट प्रेसीडेंट ट्रॉफीमध्ये इमाम उल हकने शतकाची स्क्रिप्ट लिहिली. कराचीमध्ये हा सामना खेळला जातोय. ऑइल एन्ड गॅस कंपनी लिमिटेड आणि पाकिस्तान टेलीविजनची टीम आमने-सामने आहे. इमाम उल हक पाकिस्तान टेलीविजन PTV कडून खेळत होता.
एकट्याने 158 रन्स ठोकले
ऑइल एन्ड गॅस कंपनी लिमिटेड प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 278 धावा केल्या. प्रत्युत्तर पाकिस्तान टेलीविजनकडून ओपनिंगला आलेल्या इमाम उल हकने एकट्याने 158 रन्स ठोकले. इमाम उल हकने 218 चेंडूंचा सामना करताना 18 चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. इमाम उल हकच्या शतकाच्या बळावर PTV ने 20 फेब्रुवारीला खेळ संपताना 9 विकेट गमावून 273 धावा केल्या आहेत. ते अजूनही 5 धावानी पिछाडीवर आहेत.
वनडेमध्येही त्याच फॉर्ममध्ये
प्रेसीडेंट ट्रॉफीमध्ये इमाम उल हकने झळकवलेल शतक खास आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानी टीममध्ये निवड झालेली असताना त्याने हे शतक झळकावलं. तुम्ही म्हणालं, इमामने हे शतक रेड बॉल क्रिकेटमध्ये झळकवलय. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वनडे मॅचेस आहेत. तो क्रिकेटच्या वनडे फॉर्मेटमध्ये सुद्धा त्याच फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शाहीन्सकडून खेळताना त्याने 98 धावा केल्या. 17 फेब्रुवारीला हा सामना झाला होता.