Mohammed Shami : आधी न्यूझीलंड दौऱ्यासाठी विचार नाही आता मोहम्मद शमी रणजी टीम मधूनही OUT
Mohammed Shami : मोहम्मद शमीला आता रणजी टीमच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर ठेवण्यात आलय. पण का?. नुकतीच न्यूझीलंड दौऱ्यासाठी वनडे आणि टेस्ट टीमची घोषणा झाली. त्यात शमीच्या नावाचा विचार झाला नाही.

पश्चिम बंगालची टीम रणजी ट्रॉफीचा आपला दुसरा सामना सर्विसेज विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी बंगालच्या टीमने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. त्यातून मोहम्मद शमीचं नाव गायब आहे. आता प्रश्न हा येतो की, पहिल्या रणजी सामन्यात ज्या शमीने पश्चिम बंगालसाठी पाच विकेट घेतले, आता अचानक त्याला दुसऱ्या सामन्यातून का बाहेर केलं? न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या वनडे आणि कसोटी टीममध्ये मोहम्मद शमीला स्थान मिळालेलं नाही, बंगालने त्याला दुसऱ्या रणजी सामन्यासाठी वगळण्यामागे हेच कारण आहे का?.
शमीला बंगालच्या प्लेइंग इलेवन बाहेर का करण्यात आलय? त्या बद्दल अधिकृत माहिती नाहीय. पण त्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आलेलं असू शकतं. रिपोर्ट्नुसार बंगाल आणि सर्विसेजची मॅच सुरु होण्याआधी शमी फिजियो सोबत मैदानाबाहेर जाताना दिसला. यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली की, प्लेइंग इलेवन बाहेर ठेवण्याचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलं न जाण्याशी काही संबंध नाहीय.
इतकं चांगलं खेळून पण विचार नाही झाला
मोहम्म शमीने दिल्ली विरुद्ध पहिल्या रणजी सामन्यात पाच विकेट काढले होते. त्याने पहिल्या डावात चार विकेट काढलेले. दुसऱ्या इनिंगमध्ये एक विकेट काढलेला. बंगालने दिल्ली विरुद्ध 9 विकेटने विजय मिळवून रणजी ट्रॉफी सीजनची दमदार सुरुवात केलेली. दिल्ली विरुद्ध इतकं चांगलं खेळूनही मोहम्मद शमीचा न्यूझीलंड सीरीजसाठी विचार झाला नाही.
दोनवेळा 10 पेक्षा जास्त विकेट काढलेत
भुवनेश्वर कुमारचा चार वर्षानंतर टीममध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे शमीच्या समावेशाची अपेक्षा वाढलेली. पण टीममध्ये निवड न झाल्याने पुन्हा एकदा शमी उदास झाला आहे. मोहम्मद शमी आतापर्यंत 101 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. त्यात त्याने 389 विकेट काढलेत. 15 वेळा शमीने पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट काढलेत. दोनवेळा 10 पेक्षा जास्त विकेट काढलेत. मोहम्मद शमी मागच्या अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळेल या प्रतिक्षेत आहेत. तो स्वत:ला सिद्धही करतोय.