IND A vs NZ A : न्यूझीलंड विरुद्ध इंडिया ए चं जबरदस्त कमबॅक, सगळ्यांचीच तोंड केली बंद, स्टेडियमबाहेरच्या झाडावर सिक्स मारुन देवदत्त पडिक्कलची सेंच्युरी

IND A vs NZ A : न्यूझीलंड ए आणि इंडिया ए मध्ये टेस्ट मॅच सुरु आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियाचा खेळ पाहून असं वाटलेलं की, हे तीन दिवस तरी टिकाव धरतील का? पण आज इंडिया ए च्या प्लेयर्सनी कमाल केली. सगळ्यांचीच तोंड बंद करुन टाकली.

IND A vs NZ A : न्यूझीलंड विरुद्ध इंडिया ए चं जबरदस्त कमबॅक, सगळ्यांचीच तोंड केली बंद, स्टेडियमबाहेरच्या झाडावर सिक्स मारुन देवदत्त पडिक्कलची सेंच्युरी
devdutt padikkal
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 26, 2026 | 9:40 AM

टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर असताना भारताचा ‘अ’ संघ सुद्धा न्यूझीलंड टूरवर आहे. भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ मध्ये अनऔपचारिक चार दिवसीय कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी इंडिया ए ने सुमार दर्जाच प्रदर्शन केलं होतं. पण आज तिसऱ्यादिवशी टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. देवदत्त पडिक्कल हिरो ठरला आहे. त्याने शानदार शतक झळकावलं. तिसऱ्या विकेटसाठी साई सुदर्शनसोबत द्विशतकीय भागीदारी केली. टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढलं. सध्या पाच बाद 377 अशी भारताची स्थिती असून टीम इंडियाकडे 173 धावांची आघाडी आहे. इंडिया ए चा पहिला डाव 113 धावात आटोपला होता. त्यानंतर न्यूझीलंडचा ए ने पहिल्या डावात 317 धावा केल्या. न्यूझीलंडकडे 204 धावांची आघाडी होती. पण आता भारत 173 धावांनी पुढे आहे.

याचं सर्व श्रेय जात देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन आणि यश राठोड यांना. देवदत्तची डबल सेंच्युरी अवघ्या एक रन्सने हुकली. त्याने 248 चेंडूत 199 धावा केल्या. यात 24 फोर आणि 3 सिक्स मारले. साई सुदर्शनने 184 चेंडूत 91 धावा केल्या. त्याने 12 फोर मारले. यश राठोड 66 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. पहिल्या डावातील अवस्था पाहून इंडिया ए तीन दिवस तरी टिकाव धरेल का असा प्रश्न निर्माण झालेला. पण इंडिया ए ने सर्वांचीच तोंडं बंद केली आहेत.

Loading...

देवदत्त पडिक्कल फक्त शतक झळकवूनच थांबला नाही

देवदत्त पडिक्कलने थेट षटकार ठोकून आपलं शतक पूर्ण केलं. हा सिक्स इतका लांबलचक गेला की, चेंडू मैदानाच्या बाहेर असलेल्या झाडावर जाऊन पडला. त्याचं फर्स्ट क्लास करिअरमधील हे 12 वं शतक आहे. न्यूझीलंड ए आणि इंडिया ए मध्ये शतक ठोकणारा पडिक्कल पहिला फलंदाज बनला आहे. पडिक्कलच्या शतकाची खास बाब ही आहे की, तिसऱ्या विकेटसाठी त्याने साई सुदर्शन सोबत 215 धावांची भागीदारी केली. 340 चेंडूत ही भागीदारी त्यांनी केली. यात साई सुदर्शनने 91 धावा आणि पडिक्कलने 118 रन्स केल्या. देवदत्त पडिक्कल फक्त शतक झळकवूनच थांबला नाही, तर त्याने त्याच अंदाजात न्यूझीलंड ए विरुद्ध आपल्या दुसऱ्याडावात 150 धावाही पूर्ण केल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमझ्ये देवदत्त पडिक्कलच्या सर्वाधिक 232 धावा आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us