IND vs NZ: तिलक-नितीशच्या जोडीनं मॅच जिंकवली, पण श्रेयसने भलत्यालाच दिलं क्रेडिट, मॅचनंतर काय म्हणाला?
Shreyas Iyer On Team India Victory: भारत आमि न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने जे विधान केले त्याची चर्चा सुरु आहे.

IND vs NZ 2nd T20 Match: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शनिवारी (२४ ऑक्टोबर) क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी२० सामना ४ गडी राखून जिंकला. संघाच्या विजयात तिलक वर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २६ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या. या खेळीसाठी तिलकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आणि तो विजयाचा नायक ठरला. पण सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर जे म्हणाला आता त्याची चर्चा रंगली आहे.
सामन्यानंतर अय्यर म्हणाला की, “प्रत्येक खेळाडूमध्ये सामना जिंकण्याची क्षमता असते. माझा विश्वास आहे की आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये सामना जिंकण्याची क्षमता आहे आणि आज आम्ही त्याचे एक उत्तम उदाहरण पाहिले. जेव्हा आम्ही झटपट विकेट गमावल्या, तेव्हा सामना हातातून निसटत आहे असे वाटत होते, पण तिलक आणि रेड्डीने दृढनिश्चय दाखवला. नमन धीरनेही एक शानदार खेळी केली.”
१७ चेंडूंमध्ये ३१ धावा करणाऱ्या नमन धीरविषयी अय्यर म्हणाला, “आम्ही त्याला याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत पाहिले आहे. तो एक उत्कृष्ट गोलंदाजही आहे. जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये योगदान देतो, तेव्हा संघाला एक वेगळीच ताकद मिळते. शिवाय, मैदानावरची त्याची चपळाई दाखवते की तो एक परिपूर्ण खेळाडू आहे.”
भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्ही सुरुवातीला बरेच निर्धाव चेंडू खेळलो, ज्यामुळे धावगतीवर दबाव वाढला. सामना नियंत्रित पद्धतीने पुढे नेणे हे आमचे ध्येय होते, पण त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. विशेषतः ब्रेसवेल आणि सँटनर यांनी मधल्या षटकांमध्ये ज्या प्रकारे खेळावर नियंत्रण ठेवले, त्यामुळे फलंदाजी करणे कठीण झाले. चेंडू मारणे सोपे नव्हते, पण जर आम्ही फटी शोधून चौकार मारण्याचा प्रयत्न केला असता, तर आम्ही सहज जिंकू शकलो असतो. असो, असे घडते. तो फक्त एक वाईट दिवस होता आणि मला खात्री आहे की आम्ही अधिक मजबूत होऊन परत येऊ.”
भारताच्या क्षेत्ररक्षणाबद्दल बोलताना अय्यर म्हणाला, “संघातील प्रत्येक खेळाडूला असा संदेश देण्यात आला होता की, प्रत्येक चेंडूचा अंदाज घ्या आणि फक्त एक धाव द्यायची आहे असे गृहीत धरा. चेंडूच्या दिशेने वेगाने धावणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून विरोधी फलंदाजाला दोन धावा घेण्याबद्दल दोनदा विचार करावा लागेल.”
