IND vs PAK: भारताच्या यंग ब्रिगेडनं मैदान गाजवलं, पाकिस्तानची जिरवली अन् सुवर्णपदक जिंकलं
IND vs PAK Match Result: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुवर्णपदकासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत लढत झाली, जी भारतीय संघाने जिंकली आणि भारतीय संघाला सुवर्णपदक मिळाले.

भारतीय क्रिकेट संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या टी-२० प्रकारात सुवर्णपदकही जिंकले आहे. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले. शेवटच्या षटकापर्यंत सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाने पराक्रम केला.
भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी केवळ दोन षटकांत २८ धावा करून वेगवान सुरुवात केली. मात्र, तिसऱ्या षटकात वैभव बाद झाला, तर संजू सॅमसनही फार काळ टिकू शकला नाही. अभिषेक शर्माने मात्र आपली स्फोटक फलंदाजी सुरूच ठेवत केवळ २० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने केवळ २८ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. पण त्यानंतर ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर फार काही करू शकले नाहीत. अखेरीस, तिलक वर्माच्या २२ चेंडूंतील ५१ धावा आणि शिवम दुबेच्या १५ चेंडूंतील २७ धावांनी संघाला २११ धावांपर्यंत पोहोचवले.
दुसरीकडे, पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली आणि त्यांनी अवघ्या ३९ धावांत तीन गडी गमावले. अक्षर पटेलने दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. पण त्यानंतर हसन नवाझने भारतीय गोलंदाजांवर चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत हल्ला चढवला. मात्र, आपल्या डावाच्या सुरुवातीलाच, ४ धावांवर असताना वैभव सूर्यवंशीने एक झेल सोडला.
पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत बाजी लढवत होता पण जिंकणं काही शक्य झाले नाही. भारतीय संघाकडून फक्त तिलक आणि अभिषेकच्या जोडीला कमाल करता आली. तिलक आणि अभिषेकच्या अर्धशतकी खेळीच्या जीवावर भारतीय संघाने इतक्या धावा केल्या नाही तर २११ चा डोंगरव उभारला गेला नसता, तर कदाचित भारतीय संघाला विजय मिळवताना बऱ्यात अडचणींचा सामना करावा लागला असता. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन विकेट काढल्या. चाहत्यांना एक खंत असेल की जसप्रीत बुमराहने एकही विकेट काढली नाही. बुमराहला आज बराच संघर्ष करावा लागला आणि यश काही मिळालेच नाहीय.
