AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: वेस्ट इंडिजचा कॅप्टन शाई होपला जे अनेक वर्षांपासून झालं नाही ते करायचं, भारतात येऊन भारतालाच…

Shai Hope On Team India: हैदराबादमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताला पराभूत करून वेस्ट इंडिजने मालिकेत अधिक रोमांच निर्माण केला आहे. आता, अनेक वर्षांपासून जे साध्य करता आले नाही, ते साध्य करण्याची त्यांची इच्छा वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने बोलून दाखवली आहे.

IND vs WI: वेस्ट इंडिजचा कॅप्टन शाई होपला जे अनेक वर्षांपासून झालं नाही ते करायचं, भारतात येऊन भारतालाच...
| Updated on: Oct 15, 2026 | 10:43 AM
Share

IND vs WI 4th T20 Match: हैदराबादमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताला पराभूत करून वेस्ट इंडिजने मालिकेत अधिक रोमांच निर्माण केला आहे. आता, अनेक वर्षांपासून जे साध्य करता आले नाही, ते साध्य करण्याची त्यांची इच्छा वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने बोलून दाखवली आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप काय म्हणाला ते पाहा…

हैदराबादमध्ये चौथा टी-२० सामना जिंकल्यानंतर, वेस्ट इंडिजचा व्हाईट-बॉल कर्णधार शाई होप म्हणाला, “आमच्या संघाने प्रत्येक टप्प्यात चांगले क्रिकेट खेळले आहे आणि आम्हाला पुढेही हीच गती कायम ठेवण्याची गरज आहे. पाचवा आणि अंतिम टी२० सामना बंगळूरुमध्ये आहे, जिथे आम्हाला मालिका जिंकण्याची संधी मिळेल. आम्ही त्याच इराद्याने मैदानात उतरू आणि आमचे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करू. भारतात शेवटची मालिका जिंकून बरीच वर्षी लोटली आहे तर आता आमचे ध्येय ते असणार आहे.”

वेस्ट इंडिजने भारतात शेवटची टी२० मालिका सात वर्षांपूर्वी, डिसेंबर २०१९ मध्ये जिंकली होती. त्यावेळी, वेस्ट इंडिजने भारताविरुद्धची तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ ने जिंकली होती. त्या काळात, वेस्ट इंडिजने हैदराबादमध्ये पहिला टी२० सामना गमावला होता. त्यांनी तिरुवनंतपुरम आणि मुंबई येथे पुढील दोन सामने जिंकले.

२०१९ नंतर, वेस्ट इंडिज संघ २०२१ मध्ये टी२० सामन्यांसाठी भारतात परतला, जिथे त्यांनी तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत विजय मिळवला. त्यानंतर, सध्याचा दौरा आहे, ज्यामध्ये पाच टी२० सामन्यांचा समावेश आहे. मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे. भारतीय संघाची कामगिरी अनपेक्षित होती कारण संपूर्ण संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, फलंदाजी विभाग योग्यरितीने कामगिरी करत आहे, पण गोलंदाजीत भारतीय संघाची कामगिरी हवी तशी पाहायला मिळत नाहीये.

पुढील सामन्यावर सर्वाचे लक्ष लागून असणार आहे. जर वेस्ट इंडिजने शेवटचा सामना जिंकला तर सात वर्षांचा दुष्काळ संपेल आणि भारतात मालिका जिंकता येईल.

Follow Us
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....