AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने कमबॅकसाठी 15 नाही तर 78 नंबरची जर्सी का घातलेली? कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Bhuvneshwar Kumar Changed Jersey Number: भारत वेस्ट इंडिज पावच्या टी-२० सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारने चक्क आपल्या जर्सीचा नंबर बदललेला पाहायला मिळाला पण का ते कारणही आता समोर आले आहे.

Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने कमबॅकसाठी 15 नाही तर 78 नंबरची जर्सी का घातलेली? कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
| Updated on: Oct 18, 2026 | 9:42 AM
Share

Bhuvneshwar Kumar Jersey: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेत भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीची संधी मिळाली नाही, पण त्याचा नवीन जर्सी क्रमांक चर्चेचा विषय बनला. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत १५ क्रमांकाची जर्सी परिधान करणाऱ्या भुवनेश्वरला या सामन्यादरम्यान ७८ क्रमांकाची जर्सी घातलेली पाहिले गेले. याचे कारण ऐकून तुम्हालाही भुवीचा हेवा वाटेल.

भुवनेश्वर जेव्हा टीम इंडियात नियमित खेळत होता तेव्हा तो १५ क्रमांकाची जर्सी घालून खेळायचा. आता कालच्या सामन्यात त्याने ७८ क्रमांक निवडला. भूवीने स्वत:चा १५ क्रमांक सोडला कारण होता गुरनू ब्रार. गुरनूर सध्या एकदिवसीय भारतीय संघाचा भाग असून तो १५ क्रमांकाची जर्सी घालतो. भुवनेश्वरने या तरुण खेळाडूसाठी आपला आवडता जर्सी क्रमांक सोडून दिला आणि तो ७८ क्रमांकाची जर्सी परिधान केलेला दिसला.

अनेक चाहत्यांनी याचा अर्थ असा लावला की, ७ आणि ८ यांची बेरीज १५ होते. त्यामुळेच भुवनेश्वरने आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात ७८ क्रमांकाची जर्सी परिधान केली. गुरनूर आणि भुवनेश्वर न्यूझीलंड दौऱ्यावर भारतासाठी खेळताना दिसतील. भुवनेश्वर टी-२० संघाचा भाग आहे, तर गुरनूर एकदिवसीय संघाचा भाग आहे.

कालच्या सामन्यात चाहते भुवीच्या कमबॅकसाठी आतुर होते. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही मिळाली पण मैदानावर येता आले नाही. चिन्नास्वामीच्या स्टेडियमवर कालचा सामना रंगला. सुरुवातीला पाऊस आल्याने सामना थोडा उशिराने सुरु झाला. पाऊस थांबताच भारताची पहिली फलंदाजी असल्याने फलंदाज मैदानावर आले. सामना सुरु झाला पण पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन झाले आणि सामना रद्द करावा लागला. यामुळे भुवीची गोलंदाजी चाहत्यांना पाहताच आली नाही.

भुवनेश्वर कुमार आता २२ ऑक्टोबर रोजी भारतासाठी खेळण्याची शक्यता आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गंभीर यांनी बंगळूरुमध्ये भुवनेश्वरला अंतिम ११ खेळाडूंमध्ये समाविष्ट करण्याची घेतलेली घाई हे स्पष्टपणे दर्शवते की, न्यूझीलंडमधील पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळणे निश्चित आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या स्विंग आणि बाऊन्स या दोन्हींमुळे वेगवान गोलंदाजांना लक्षणीय पाठिंबा देतात. त्यामुळे, भुवनेश्वर कुमार आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल.

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...