AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा सलग पाचवा टी 20 मालिका विजय

टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे.

India vs Australia 2020  | टीम इंडियाचा सलग पाचवा टी 20 मालिका विजय
| Updated on: Dec 06, 2020 | 7:09 PM
Share

सिडनी : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात (India vs Australia 2020 2nd T20) ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिका जिंकली.  भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने मालिकाही जिंकली. टीम इंडियाचा टी 20 मधील सलग दहावा विजय ठरला. दरम्यान यासह टीम इंडियाने आणखी एक विक्रमी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील हा मालिका विजय टीम इंडियाचा सलग 5 वा टी 20 मालिका विजय ठरला आहे. india vs australia 2020 Team India’s fifth consecutive T20 series win

टीम इंडियाने या पाचही टी 20 मालिका कर्णधार विराटच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत. टीम इंडियाने या मालिका  कोणत्या संघासोबत खेळल्या तसेच किती फरकाने जिंकल्या ही आकडेवारी आपण पाहणार आहोत.

बांगलादेशवर 2-1 ने विजय

बांगलादेश (Bangladesh Cricket Team) विरुद्ध टीम इंडिया यांच्यात नोव्हेंबर 2019 मध्ये 3 सामन्याची मालिका खेळण्यात आली. या मालिकेतील सामने अनुक्रमे 3, 7 आणि 10 नोव्हेंबरला खेळण्यात आले. बांगलादेशने या मालिकेची विजयी सुरुवात केली. बांगलादेशने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने उर्वरित 2 ही सामने जिंकले आणि मालिका खिशात घातली.

वेस्टइंडिजवर 2-1 ने विजय

बांगलादेशविरोधात टी 20 मालिकेनंतर लगेचच टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरोधात (West Indies Cricket Team) 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळली. यामध्ये टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने सीरिज जिंकली. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. तर विंडिजने दुसरा सामना जिंकत पुनरागमन केलं. यामुळे मालिकेत दोन्ही संघांनी बरोबरी साधली. मात्र टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विंडिजला पराभवाची धूळ चारत मालिकेवर नाव कोरलं.

श्रीलंकेवर 2-1 ने मात

टीम इंडियाची 2020 या नववर्षाची सुरुवात टी 20 मालिकेने झाली. टीम इंडियाने श्रीलंकेविरोधात (Sri Lanka Cricket) 3 सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला. यामुळे मालिका विजयासाठी दोन्ही संघाना उर्वरित 2 सामने जिंकणं बंधनकारक होत. मात्र टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकत मालिका जिंकली. यासह टीम इंडियाने टी 20 मालिका विजयाची हॅटट्रिक साजरी केली.

न्यूझीलंडचा 5-0 सुपडा साफ

जानेवारी-फेब्रुवारी 2020 दरम्यान टीम इंडिया न्यूझीलंड (India Tour New Zealand 2020) दौऱ्यावर होती. या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात आली. टीम इंडियाने न्यूझीलंडचा त्यांच्याच घरात 5-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला.

ऑस्ट्रेलियावर 2-0 ने आघाडी

दरम्यान सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मालिका (India Tour Australia 2020-21) खेळत आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने टीम इंडियाने जिंकलेत. यासह मालिकाही जिंकली आहे. दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी 8 नोव्हेंबरला सिडनी येथे खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | एकदिवसीय आणि टी 20 पदार्पण, जस्प्रीत बुमराह आणि थंगारासूचा भन्नाट योगायोग, वीरेंद्र सेहवागकडून खुलासा

india vs australia 2020 Team India’s fifth consecutive T20 series win

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...