India vs Australia 2020 | एकदिवसीय आणि टी 20 पदार्पण, जस्प्रीत बुमराह आणि थंगारासूचा भन्नाट योगायोग, वीरेंद्र सेहवागकडून खुलासा

वीरेंद्र सेहवागने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही आकडेवारी शेअर केली आहे.

India vs Australia 2020 | एकदिवसीय आणि टी 20 पदार्पण, जस्प्रीत बुमराह आणि थंगारासूचा भन्नाट योगायोग, वीरेंद्र सेहवागकडून खुलासा
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 6:26 PM

कॅनबेरा : भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टी 20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने या 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना 150 धावांवरच रोखले. या सामन्यात पदार्पण केलेला थंगारासू नटराजन चमकला. थंगारासूने 4 ओव्हरमध्ये 30 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. जसप्रीत बुमराहला विश्रांती देत थंगारासूला संधी देण्यात आली होती. India vs Australia 2020  Jasprit Bumrah and Thangarasu natarajan compare t20 and odi debut statistics by Virendra Sehwag

थंगारासू आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून चमकदार कामगिरी करतोय. थंगारासूने ऑस्ट्रेलियाविरोधातच एकदिवसीय पदार्पण केलं. त्याच्या कामगिरीचं आजी माजी खेळाडूंकडूनही कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने बुमराह-नटराजन यांच्यात तुलना करत साम्य असलेली आकडेवारी शेअर केली आहे. यामध्ये या दोन्ही गोलंदाजांच्या बाबतीत भन्नाट योगायोग जुळून आलेला पाहायला मिळतोय. सेहवागने इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही आकडेवारी शेअर केली आहे.

काय आहे योगायोग

बुमराह आणि नटराजन या दोघांबाबतीतील भन्नाट योगायोग आपण पाहणार आहोत.

या दोन्ही गोलंदाजांना बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं होतं. ज्या खेळाडूंना मुळ रुपात निवड करण्यात आली होती, ते खेळाडू मालिकेआधी दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे या दोघांना बदली खेळाडू म्हणून संघात संधी मिळाली.

या दोन्ही गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरोधातच एकदिवसीय आणि टी 20 पदार्पण केलं. विशेष म्हणजे दोघांनी एकदिवसीय मालिकेतील शेवटच्याच सामन्यात एकदिवसीय पदार्पण केलं. तसेच तो सामना टीम इंडियानेच जिंकला होता. बुमराह आणि थंगारासूने एकदिवसीय पदार्पणात 2 तर टी 20 पदार्पणात 3 विकेट्स घेतल्या आहेत.

नशीब फळफळलं

थंगारासूची ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आलीच नव्हती. मात्र या दौऱ्याच्या आधी वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे वरुणच्या जागी थंगारासूला संधी देण्यात आली. तर थंगारासूला एकदिवसीय मालिकेत बॅकअप खेळाडू म्हणून संधी मिळाली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला पाठदुखीचा त्रास होता. यामुळे एकदिवसीय मालिकेत थंगारासूला संधी देण्यात आली.

थंगारासूने आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं. थंगारासू आयपीएलच्या 13 व्या मोसमात हैदराबादकडून खेळत होता. या 16 सामन्यात त्याने 16 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे आयपीएलच्या 13 व्या मोसमात सर्वाधिक यॉर्कर टाकण्याची कामगिरी त्याने केली.

संबंधित बातम्या :

Thangarasu Natarajan | चाळीत टेनिस बोलने यॉर्करचा सराव, ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 पदार्पण, थंगारासू नटराजनची संघर्षकथा

India vs Australia 2020 | केएल राहुलऐवजी ‘या’ खेळाडूने शिखरसोबत सलामीला यावे, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा सल्ला

India vs Australia 2020 Jasprit Bumrah and Thangarasu natarajan compare t20 and odi debut statistics by Virendra Sehwag

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.