AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh : भारताचा नंबर 1 टी 20 गोलंदाज, खात्यात 100 विकेट, तरी अर्शदीप सिंहला प्रत्येक सामन्यात का खेळवत नाही? मॉर्ने मॉर्कलनी दिलं उत्तर

Arshdeep Singh : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा टी 20 सामना क्वीन्सलँड ओव्हलमध्ये खेळवला जाणार आहे. या मॅचआधी भारताचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कल यांनी मीडियाशी चर्चा केली. अर्शदीप सिंहला प्रत्येक सामन्यात का खेळवलं जात नाही? याचं उत्तर त्यांनी दिलं.

Arshdeep Singh : भारताचा नंबर 1 टी 20 गोलंदाज, खात्यात 100 विकेट, तरी अर्शदीप सिंहला प्रत्येक सामन्यात का खेळवत नाही? मॉर्ने मॉर्कलनी दिलं उत्तर
Arshdeep Singh Image Credit source: PTI
| Updated on: Nov 05, 2025 | 2:24 PM
Share

अर्शदीप सिंह भारताचा नंबर 1 टी 20 गोलंदाज आहे. तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे, ज्याने टी 20 इंटरनॅशनलमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतलेत. इतकच नाही, या खेळाडूने होबार्टमध्ये टीम इंडियाला जिंकवलं. प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. मग, प्रश्न हा येतो की, इतके चांगले आकडे आणि टॅलेंट असताना प्रत्येक सामन्यात त्याला संधी का मिळत नाही?. याचं उत्तर भारतीय बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कलने दिलं. मॉर्ने मॉर्कलने सांगितलं की, ‘अर्शदीप सिंह बाहेर ठेवणं ही टीम इंडियाची रणनिती आहे’

मॉर्ने मॉर्कल यांनी गुरुवारी होणाऱ्या चौथ्या टी 20 आधी मीडियाशी चर्चा केली आहे. त्यांनी पहिल्या टी 20 मध्ये अर्शदीप का खेळला नाही, त्याचं कारण सांगितलं. मॉर्कल म्हणाले की, “अर्शदीप सिंह अनुभवी गोलंदाज आहे. त्याला माहितीय आम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करतो. तो एक वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे. त्याने आम्हाला पावरप्लेमध्ये बरेच विकेट मिळवून दिलेत. आम्हाला माहितीय तो टीमसाठी किती किंमती आहे. पण या दौऱ्यावर आम्हाला दुसरे कॉम्बिनेशन सुद्धा ट्राय करायचे आहेत. अर्शदीपला ही गोष्ट समजते”

टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय खेळाडूंना कठोर वाटू शकतो

मॉर्ने मॉर्कल म्हणाले की, “टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय खेळाडूंना कठोर वाटू शकतो. पण टी 20 वर्ल्ड कप आधी वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करणं गरजेच आहे. हे सोपं नाहीय. सिलेक्शवरुन निराशा होते”

अर्शदीप चौथ्या सामन्यात खेळणार का?

अर्शदीप सिंह चौथ्या टी 20 मध्ये खेळणार हे निश्चित आहे. ही मॅच टीम इंडियासाठी खूप महत्वाची आहे. कारण हरलो, तर सीरीज जिंकता येणार नाही. अर्शदीप सिंह चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्याची गोलंदाजी खेळताना संघर्ष करावा लागतोय. अर्शदीपने ऑस्ट्रेलियातील 6 सामन्यात 10 विकेट घेतलेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो मोठा विकेट टेकर असल्याच या आकड्यांवरुन स्पष्ट होतं. अर्शदीपने टी 20 इंटरनॅशनलमध्ये 66 सामन्यात 104 विकेट घेतलेत.

बिबट्याची दहशत लैच बेक्कार! या जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको मिळेना
बिबट्याची दहशत लैच बेक्कार! या जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको मिळेना.
स्टेजवर हे काय? नवरा-नवरीला भेटण्यास गर्दी अन् त्यांनी काढला चाकू...
स्टेजवर हे काय? नवरा-नवरीला भेटण्यास गर्दी अन् त्यांनी काढला चाकू....
दिल्लीच्या स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्..
दिल्लीच्या स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्...
भयानक... अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप
भयानक... अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप.
आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा दोघांचा कट पण..
आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा दोघांचा कट पण...
धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी
धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी.
मुंबई महापालिकेच्या आरक्षणात कुणाचा पत्ता कट? वॉर्डनिहाय सोडत जाहीर
मुंबई महापालिकेच्या आरक्षणात कुणाचा पत्ता कट? वॉर्डनिहाय सोडत जाहीर.
धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी, डिस्चार्ज नंतरही उचपार...
धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी, डिस्चार्ज नंतरही उचपार....
बॉम्ब फुटनेवाला है, त्यानं एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये खडूनं लिहिलं अन्
बॉम्ब फुटनेवाला है, त्यानं एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये खडूनं लिहिलं अन्.
बिहारमध्ये सत्ता कोणाची? नितीश की तेजस्वी? सर्वांत मोठा एक्झिट पोल
बिहारमध्ये सत्ता कोणाची? नितीश की तेजस्वी? सर्वांत मोठा एक्झिट पोल.