AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | शानदार विजयासह कर्णधार कोहलीचा ‘विराट’ विक्रम, ‘कॅप्टन कुल’ धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 3rd test) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात इंग्लंडचा 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

Virat Kohli | शानदार विजयासह कर्णधार कोहलीचा 'विराट' विक्रम, 'कॅप्टन कुल' धोनीचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 3rd test) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात इंग्लंडचा 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
| Updated on: Feb 25, 2021 | 9:01 PM
Share

अहमदाबाद | टीम इंडियाने अहमदाबादमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 3rd test) पाहुण्या इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाच्या शुबमन गिल (Shubaman Gill) आण रोहित शर्मा (Rohit Sharma) या सलामी जोडीने पूर्ण केलं. रोहित आणि शुबमन या सलामी जोडीने अनुक्रमे नाबाद 25 आणि 15 धावा केल्या. टीम इंडियाने कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात ही कामगिरी केली. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. दरम्यान या विजयासह कॅप्टन विराटने किर्तीमान केला आहे. विराटने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. (india vs england 3rd test virat kohli break ms dhoni record of most wins as indian captain in tests in india)

काय आहे रेकॉर्ड?

इंग्लंड विरुद्धचा हा विजय विराटच्या नेतृत्वातील 22 वा कसोटी विजय ठरला. म्हणजेच विराटने टीम इंडियाला भारतात 22 कसोटींमध्ये विजय मिळवून दिला आहे. या विजयासह विराटने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. धोनीने भारतात आपल्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाला एकूण 21 कसोटींमध्ये विजय मिळवून दिला होता.

धोनीने भारतात 30 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यापैकी 21 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा विजय झाला होता. तर विराटने त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला भारतात 29 कसोटींमधून 22 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.

टीम इंडियाला भारतात सर्वाधिक सामने जिंकवणारे कर्णधार

विराट कोहली- 22 कसोटी

महेंद्रसिंह धोनी – 21 कसोटी

मोहम्मद अझरुद्दीन – 13

चौथी कसोटी 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस असेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची दावेदारी आणखी प्रबळ करण्याचा मानस भारतीय संघाचा असेल.

संबंधित बातम्या :

IND vs ENG 3rd Test : अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, कसोटीत 400 तर 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा पार

India vs England 3rd Test | फिरकीपटू अश्विनचा किर्तीमान, कसोटीमध्ये 400 विकेट्स पूर्ण, ठरला चौथा भारतीय

(india vs england 3rd test virat kohli break ms dhoni record of most wins as indian captain in tests in india)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.