AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 3rd Test : अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, कसोटीत 400 तर 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा पार

आर. अश्विनने (Ravichandran Ashwin) दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरला बाद करत हा अफलातून किर्तीमान केला आहे.

IND vs ENG 3rd Test : अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, कसोटीत 400 तर 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा पार
आऱ अश्विन
| Updated on: Feb 25, 2021 | 7:23 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (india vs england 2021 3rd test) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव 145 धावांवर संपवला. भारताला 33 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. त्यानंतर मैदानात आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या फिरकी गोलंदाजांनी चांगलंच जेरीस आणलं. इंग्लंडचा दुसरा डाव भारतीय गोलंदाजांना अवघ्या 81 धावांमध्ये संपुष्टात आणला. भारताच्या फिरकीपटूंनी सर्व फलंदाजांना बाद केले. त्यामुळे भारताला आता विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान मिळाले आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) 4 विकेट्स मिळवल्या. एक विकेट वॉशिंग्टन सुंदरच्या खात्यात जमा झाली. (IND vs ENG 3rd Test : Ravichandran Ashwin comepleted 400 test wicket and 600 international wickets)

या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात 3 गडी बाद केले, दुसऱ्या डावात 4 गडी बाद करत सामन्यात एकून 7 बळी मिळवले. या कामगिरीसह अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 400 बळींचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने इंग्लंडचा जोफ्रा आर्चरला बाद करून कसोटीत 400 बळींचा टप्पा गाठला. त्याच्याआधी भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि हरभजन सिंग (417) यांनी ही कामगिरी केली आहे. यासह अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 600 बळीही पूर्ण केले आहेत.

मुरलीधरननंतर सर्वात जलद 400 विकेट्स

अश्विनने 400 बळी घेण्याच्या बाबतीत अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. 400 विकेट्स घेणारा तो जगातील दुसरा वेगवान गोलंदाज आहे. अश्विनने आपल्या 77 व्या कसोटी सामन्यात 400 बळींचा टप्पा पार केला आहे. तर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने 72 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. जलद 400 बळी मिळवण्याच्या बाबतीत अश्विने न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज रिचर्ड हॅडलीला मागे टाकलं आहे. हॅडलीने 80 कसोटी सामन्यांमध्ये 400 बळी पूर्ण केले होते. हॅडलीबरोबर दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. स्टेननेही 80 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या रंगना हेराथचा नंबर लागतो, त्याने 84 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

600 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज

अश्विनने आर्चरच्या आधी बेन स्टोक्सला बाद करून 600 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. कसोटीत 400 विकेट घेण्याव्यतिरिक्त अश्विनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 आणि टी -20 क्रिकेटमध्ये मध्ये 52 बळी घेतले आहेत. या यादीत अश्विनच्या पुढे अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंह, झहीर खान यांची नावे आहेत. भारताचा माजी कर्णधार कुंबळे याच्या नावार 956 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. हरभजनने 711 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. हरभजननंतर विश्वचषक विजेता कप्तान कपिल देवचा नंबर लागतो. कपिल देवच्या नावावर 687 विकेट्स आहेत. तर या यादीत झहीर खान चौथ्या स्थानी आहे. झहीर खानने 610 आंतरराष्ट्रीय बळी मिळवले आहेत.

संबंधित बातम्या

Axar Patel | ना जलेबी, ना फाफडा, अक्षर पटेल आपडा, लोकल बॉय अक्षरला 11 विकेट

India vs England 3rd Test | इंग्लंडच्या कॅप्टनची अफलातून फिरकी, जो रुटचा टीम इंडियाला ‘पंच’, ठरला पहिलाच इंग्रज खेळाडू

(IND vs ENG 3rd Test : Ravichandran Ashwin comepleted 400 test wicket and 600 international wickets)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.