India vs England 5th T20i | केएल राहुलऐवजी इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्या, ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची मागणी

| Updated on: Mar 20, 2021 | 4:07 PM

इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात (india vs england 5th t 20i) केएल राहुलऐवजी (K L Rahul) इशान किशनला (Ishan Kishan) खेळवायला हवं, असं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न (Michael Vaughan) म्हणाला आहे.

India vs England 5th T20i | केएल राहुलऐवजी इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्या, या दिग्गज क्रिकेटपटूची मागणी
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात (india vs england 5th t 20i) केएल राहुलऐवजी (K L Rahul) इशान किशनला (Ishan Kishan) खेळवायला हवं, असं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न (Michael Vaughan) म्हणाला आहे.
Follow us on

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 20 मार्चला टी 20 मालिकेतील 5 वा आणि शेवटचा (India vs England 5th T20i) सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. यामुळे मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. 5 वा सामना मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. जो हा पाचवा सामना जिंकणार तो मालिका जिंकणार. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी केएल राहुलऐवजी (K L Rahul) इशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात यावी, अशी मागणी इंग्लंडचा माजी कर्णधार (Michael Vaughan) मायकल वॉर्नने केली आहे. (india vs england 5th t 20i Give Ishan Kishan a chance instead of KL Rahul said Michael Vaughan)

वॉर्न काय म्हणाला?

“या सामन्यासाठी केएल राहुलला विश्रांती द्यावी. त्याच्या जागी सलामीला रोहित शर्मासोबत इशान किशनला संधी देण्यात यावी. जर इशान फिट असेल तर त्याला खेळवावं. या दोघांपैकी सर्वोत्तम कोण हे टीम मॅनेजमेंटने ठरवावं. दोघांपैकी कोणामध्ये सर्वाधिक विश्वास आहे, हे टीम मॅनेजमेंटने पाहायला हवं”, असं वॉर्नने नमूद केलं. तो क्रिकबझच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस तो बोलत होता.

केएलला विश्रांती द्यावी

“केएलला थोड्या वेळेसाठी विश्रांती द्यायला हवी. तसेच त्याच्या जागी इशान हा अचूक पर्याय आहे. केएल माझ्यासाठी कायमचाच संघाबाहेर नसेल. पण यावेळेस केएलमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसतोय. त्याला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय”, असं म्हणत वॉर्नने आपली भूमिका स्पष्ट केली.

केएलची निराशाजक कामगिरी

केएलला मागील 5 टी 20 सामन्यात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. केएलने गेल्या 5 डावात अवघ्या 15 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील 3 सामन्यात केवळ 1 धाव केली आहे. यापैकी 2 वेळा तो शून्यावर बाद झाला आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 5th T20i Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, सामना कधी कुठे आणि केव्हा?

India vs England 5th T20i | टी 20 मालिका कोण जिंकणार? ‘आकाश’वाणीची भविष्यवाणी, म्हणाला….

(india vs england 5th t 20i Give Ishan Kishan a chance instead of KL Rahul said Michael Vaughan)