
India vs New Zealand Head to Head T20I Matches : T20 वर्ल्ड कप 2026 ( T 20 World Cup Final) ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना उद्या, 8 मार्च रोजी होणार आहे, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड फायनलमध्ये आमनेसामने येतील. हा सामना जिंकून टी 20 वर्ल्डकपची ट्रॉफी तिसऱ्यांदा उचलण्याचं टीम इंडियाचं ध्येय असेल तर तर भारताला हरवून पहिल्यांदाच टी-20 वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरण्याचं न्युझीलंडच्या टीमचं लक्ष्य असेल. पण या दोन्ही संघामध्ये वरचढ कोम आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यासाठी तुम्हाला दोन्ही संघांच्या 30 टी20 सामन्यांचा संपूर्ण हिशोब जाणऊन घ्यावा लागेल.
IND vs NZ फायनलपूर्वी 30 सामन्यांचा हिशोब
आपण ज्या 30 टी-20 सामन्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ते भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत खेळले गेलेले सामने आहेत. यामध्ये टी-20 वर्ल्डकपमधील त्यांच्या सामन्यांचा समावेश आहे. जर आपण दोन्ही संघांमधील 30 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचे निकाल विचारात घेतले तर एकूण सामन्यांवर भारताचा वरचष्मा दिसून येतो. मात्र आयसीसी सामन्यांचा, टी20 वर्ल्डकपमधील सामन्यांचा विचार केला तर न्यूझीलंडचा विजय 100% निश्चित असल्याचे दिसून येते.
कोणाचं पारडं भारी ?
भारताने एकूण 30 पैकी 16 सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडने 11 सामने जिंकले, तर दोन्ही संघांमध्ये 3 सामने बरोबरीत सुटलेत. टी-20 वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 3 वेळा एकमेकांसमोर आले आहेत आणि तिन्ही वेळा न्यूझीलंडने भारताला नमवून विजय मिळवलाय. 2007, 2016 आणि 2021 टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता. न्यूझीलंडने 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये 10 धावांनी, 2016 साली 47 धावांनी आणि 2021 च्या वर्ल्डकपमध्ये 8 गडी राखून भारताचा पराभव केला.
भारतीय भूमीवर IND vs NZ रेकॉर्ड
T20 वर्ल्ड कप 2026 चा उद्याचा IND vs NZ हा अंतिम सामना हा भारतीय भूमीवर होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा घरच्या मैदानावरचा रेकॉर्ड जाणून घेऊया. दोन्ही संघ भारतीय भूमीवर 16 टी-20 मॅचेसमध्ये आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारत न्युझीलंडवर 11-5 अशा संख्येने वरचढ ठरला आहे.