AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : गोल्ड मेडलची मॅच, अभिषेक शर्मा खेळला पण तसाच, पाकिस्तानी बॉलर्सना नुसतं चोपलं नाही बदला घेतला

IND vs PAK : भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये एशियम गेम्स 2026 क्रिकेटची फायनल सुरु आहे. गोल्ड मेडलची ही मॅच आहे. भारताचा ओपनर अभिषेक शर्माने आज टॉप क्लास परफॉर्मन्स दिला.

IND vs PAK :  गोल्ड मेडलची मॅच, अभिषेक शर्मा खेळला पण तसाच, पाकिस्तानी बॉलर्सना नुसतं चोपलं नाही बदला घेतला
abhishek sharma
| Updated on: Oct 03, 2026 | 12:09 PM
Share

एशियम गेम्स 2026 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच सुरु आहे.टीम इंडियाने टॉस जिंकला व पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी ओपनर अभिषेक शर्माने दमदार सुरुवात करुन दिली. अभिषेकने पहिल्या ओव्हरपासून पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने अवघ्या 28 चेंडूत 61 धावा फटकावल्या. अभिषेकने संपूर्ण इनिंगमध्ये 3 फोर आणि 7 सिक्स मारले. 217.86 त्याचा स्ट्राइक रेट होता. अभिषेकने जी बॅटिंग केली तो एकप्रकारे बदलाच होता. याच वर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माने निराश केलं होतं. त्याच हे उत्तर आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी टी 20 वर्ल्ड कपच्या सामन्यात भारत-पाकिस्तानच्या टीम आमने-सामने होत्या. त्यावेळी अभिषेक शून्यावर आऊट झालेला. सलमान आगाने त्याची विकेट काढलेली. आता एशियन गेम्सच्या गोल्ड मेडल मॅचमध्ये अभिषेक पाकिस्तान विरुद्ध जोरदार इनिंग खेळला.

राफात मिन्हासने अभिषेकच्या डावाचा शेवट केला. मिन्हासच्या गोलंदाजीवर अभिषेक पुढे येऊन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता. पण चेंडूच्या फ्लाइटचा अंदाज चुकला. विकेटकिपर उस्मान खानने त्याचं सहज स्टम्पिंग केलं. अभिषेक 28 चेंडूत 61 धावा करुन बाद झाला. अभिषेकने या वर्षात टी20 मध्ये आतापर्यंत 104 सिक्स मारल्या आहेत. एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांमध्ये अभिषेक टॉपवर आहे. वैभव सूर्यवंशी 2026 मध्ये 90 सिक्स मारुन दुसऱ्या नंबरवर आहे.

एका कॅलेंडर वर्षात टी20 मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे भारतीय फलंदाज कोण?

टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांमध्ये अभिषेक टॉपवर आहे. 2025 मध्ये अभिषेकने 108, 2026 मध्ये 104, वैभव सूर्यवंशीने 2026 मध्ये 90, अभिषेकने 2024 मध्ये 87 आणि सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 85 सिक्स मारले होते.

भारताची प्लेइंग 11 : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानची प्लेइंग 11 : साहिबजादा फरहान (कॅप्टन), माज सदाकत, उस्मान खान (विकेटकिपर), सॅम अयूब, हसन नवाज, अब्दुल समद, आराफात मिन्हास, अहमद दानियाल, साद मसूद, अबरार अहमद आणि सुफियान मुकीम.

Follow Us
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?